शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई तालुक्यात ३५ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:17 IST

अंबाजोगाई तालुक्याला भीषण पाणीटंचाईने ग्रासले असून दिवसेंदिवस ग्रामीण भागातील पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला आहे. तालुक्यात ३५ टँकरद्वारे १३१ खेपा करून चाळीस गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देटँकरची मागणी वाढली । ४३ गावांत १०३ विहिरी व विंधन विहीर अधिग्रहित

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्याला भीषण पाणीटंचाईने ग्रासले असून दिवसेंदिवस ग्रामीण भागातील पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला आहे. तालुक्यात ३५ टँकरद्वारे १३१ खेपा करून चाळीस गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तर ४३ गावांमध्ये विहिरी व इंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या. मात्र, दिवसेंदिवस जलस्त्रोत निकामी होऊ लागल्याने गावोगावी टँकरची मागणी वाढू लागली आहे.पावसाळ्याचे तीन महिने सरले तरी अद्याप अंबाजोगाई तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नाही. पावसाअभावी शेतकऱ्यांची शेती अत्यंत हलाखीची झाली असून खरिपाची पिके पावसाअभावी गेली. आता रबीही नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्रतेने भेडसावू लागला आहे. वर्षभरापासून पाऊस नसल्याने ठिकठिकाणचे जलस्त्रोत दिवसेंदिवस निकामी होत चालले आहेत. गावोगावी टँकरची मागणी प्रशासनाकडे वाढू लागली आहे. अंबाजोगाई तालुक्यात सध्या ३५ टँकरद्वारे १३१ खेपा करून वाडी, वस्त्या, तांडे येथे पाणीपुरवठा सुरू आहे. तर ४३ गावांमध्ये १०३ विहिरी व विंधनविहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. या अधिग्रहण केलेल्या विहिरी व इंधन विहिरींचे पाणी दरदिवशी कमी होत चालले आहे. याचा फटका गावोगावच्या ग्रामस्थांना बसू लागला आहे. भर पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ गावोगावच्या महिला नागरिकांवर आली आहे. मिळेल तेथून पाणी मिळवणे हा एकमेव उपक्रम सध्या ग्रामस्थ राबवित आहेत.शहरी भागातही पाण्याची टंचाई दिवसेंदिवस जाणवू लागली आहे. अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाºया मांजरा धरणात गेल्या तीन वर्षांपासून पाणी न आल्याने धरण मृतसाठ्याकडे वाटचाल करीत आहे. तर अंबाजोगाई शहरालगत असलेला काळवटी साठवण तलावही यावर्षी भरला नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून काळवटी साठवण तलावाचा उपयोग पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या तलावात पाणीच न आल्याने आहे हा पाणीसाठा जेमतेम दोन ते अडीच महिने अर्ध्या गावासाठी उपयुक्त ठरू शकतो. अशी भीषण स्थिती शहरातही निर्माण झाली आहे.एकूणच तालुक्यात भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. परतीचा पाऊस न झाल्यास आगामी काळात पाणीटंचाईचा सामना तालुक्याला तीव्रतेने करावा लागणार आहे. अंबाजोगाई तालुक्यात एकूण १०४ गावे आहेत. यापैकी ४० गावांमध्ये टँकर तर ४३ गावांमध्ये विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईwater shortageपाणीकपात