शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

योजनेचे पाणी वापरले वाळू धुण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:34 IST

तालुक्यातील टाकळी अमिया येथील सरपंच सावता ससाणे यांनी पाणीपुरवठा योजनेतील पाणी गावासाठी न वापरता त्या पाण्याने वाळू धुतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी गावक-यांनी पाण्याच्या टाकीजवळ जाऊन साचलेल्या पाण्याचा व्हीडिओ व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देदुष्काळात पाण्याची नासाडी : सरपंच म्हणतात, पाईपलाईन फुटली

आष्टी : तालुक्यातील टाकळी अमिया येथील सरपंच सावता ससाणे यांनी पाणीपुरवठा योजनेतील पाणी गावासाठी न वापरता त्या पाण्याने वाळू धुतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी गावक-यांनी पाण्याच्या टाकीजवळ जाऊन साचलेल्या पाण्याचा व्हीडिओ व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दुष्काळजन्य स्थितीमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना पिण्याच्या पाण्याची नासाडी करण्याचा हा प्रकार प्रशासनाच्या दरबारात पोहोचला आहे.टाकळी अमिया या गावामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीतून गावाला पाणीपुरवठा केला जातो मात्र याच टाकीच्या पाण्यातून गावातील सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाळू धुतल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे. रविवारी सकाळी गावकरी पाण्याच्या टाकीजवळ गेल्यानंतर हा प्रकार पहायला मिळाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात सरपंचाने वाळू धुतली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. ग्रामपंचायत कार्यालय टाकळी यांनी गावातील सर्व जनतेकडून पंधराशे रु पये नळपट्टी गोळा केली आहे तरी या नळपट्टीची लेखी पावती कोणालाही दिली गेलेली नाही आणि जनतेच्या पाण्याचा गैरवापर सरपंच व त्यांचे सहकारी करत असल्याचा आरोप ग्रामस्थ अशोक हनुमंत चौधरी यांनी केला आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी सचिन एकशिंगे, सखाराम ससाणे, राजेंद्र ससाणे , अशोक एकशिंगे, किरण चौधरी, काकासाहेब भवर , आमोल शितोळे, दादा पाटील चौधरी, उध्दव ससाणे, कचरु भुकन, महेश साबळे, अजहर पठाण, विकास कर्डीले, बंटी काकडे, रामदास काका चौधरी, मोहन भागडे, श्रीमंत चौधरी आदींनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.ग्रामस्थांचे पाणी पळविले : कारवाई कराव्हिडिओ क्लीपमध्ये पाण्याच्या टाकी परिसरात पाणी दिसत आहे हे मान्य आहे, मात्र हे पाणी पाईपलाईन फुटल्यामुळे साचले असल्याचे टाकळीचे सरपंच सावता ससाणे यांनी सांगितले.अवैध वाळू उपसा करायचा आणि गावक-यांच्या पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करायचा प्रकार हा अनेक दिवसांपासून सुरु असून याबाबत सरपंचावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या गावचे रहिवासी अण्णासाहेब चौधरी यांनी केली आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई