शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे गरमीत दिलासा; आंब्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:58 IST

बीड : सोमवारी दुपारपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उन्हाच्या तीव्रतेमुळे त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. परळीत ...

ठळक मुद्देअनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित

बीड : सोमवारी दुपारपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उन्हाच्या तीव्रतेमुळे त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. परळीत विजेचा कडकडाट होत असतानाच जोरदार वारे वाहत होते. माजलगावात ढगाळ वातावरण होते, तर बीड परिसरातही सौम्य स्वरुपाचा अवकाळी पाऊस झाला. पोलीस मुख्यालय परिसरातील झाडावर वीज कोसळली, मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच धारुर तालुक्यातील गावंदरा, आंबेवडगाव, उपळी परिसरात अवकाळी पाऊस बरसला. पाटोदा शहर आणि परिसरासह तालुक्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला.सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यातच वीज खंडित झाल्याने दिवसभर काहिली होत होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार हवा, विजांचा हलकासा कडकडाट झाला. पावसाच्या सरी कोसळल्या. काही काळ पूर्ण पावसाळी वातावरण तयार झाले होते.अंबाजोगाईत २० मिनिटे कडकडाटासह पाऊससोमवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वीस मिनिटे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे आंब्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अवकाळी पाऊस वीस मिनिटे पडला. विजेचा कडकडाट सुरु होताच संपूर्ण शहरातील वीजपुरवठा बंद पडला. अंबाजोगाई शहर व परिसरात हा पाऊस सर्वत्र झाल्याने आंब्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस सुरू होताच वीजपुरवठा खंडित झाला. या अवकाळी पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी होऊन गारवा मिळाला.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस