शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

लायसन्स काढायचे? एजंट लावावा लागेल; तो पुढे चालेल, तुम्ही मागे !

By शिरीष शिंदे | Updated: December 25, 2023 15:52 IST

बीडच्या आरटीओ कार्यालयात एजंटाशिवाय होईनात कामे; अधिक दर घेत असल्याचा सर्वसामान्यांचा आरोप

बीड : पूर्वी वाहन परवाना काढण्यासाठी एजंटाशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे अनेक आरटीओ एजंट लखपती झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता वाहन परवाना काढण्यासाठी प्रक्रिया ऑनलाइन झाली असली तरी एजंटची मदत घ्यावीच लागते. तसेच रजिस्ट्री कार्यालयात एजंट ॲक्टिव्ह असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले. त्यांच्यामार्फत गेले तर कामे लवकर होतात असा अनेकांचा समज आहे. परंतु, सर्वसामान्य नागरिकसुद्धा स्वत: कागदपत्रे आरटीओ कार्यालयात दाखल करू शकतात, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आरटीओ कार्यालयात एजंटची संख्या कमी आहे. दरम्यान, अनेकांना ऑनलाइन प्रक्रिया माहीत नसल्याने अनेकजण आजही एजंटचा आधार घेऊन लायसन्ससाठी अप्लाय करतात. परंतु, आता लायसन्स नोंदणी सुविधा ऑनलाइन झाली असल्याने आरटीओ कार्यालयात एजंट संख्या कमी आहे. परंतु, त्यांच्याशिवाय आरटीओमधील कामे होत नाहीत. अनेकांनाही अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया माहिती नसते. अशावेळी एजंटाशिवाय पर्याय नसतो. यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून अधिकचा दर आकारला जातो. कोणत्या कामासाठी किती पैसे घेतले जावेत याचा काही ताळमेळ नसल्याने सर्वसामान्यांची लूट होत असल्याचे आरटीओ कार्यालयात आलेल्या लोकांचे म्हणणे आहे.

हातात कागदपत्रे घेऊन एजंट पुढेबीड शहरानजीक असलेल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात प्रवेश केल्यास एजंट लोक कागदपत्रे घेऊन पुढे, तर वाहनांच्या कामानिमित्त आलेले नागरिक त्यांच्या मागे फिरत असल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळते. लायसन्स असो वा इतर कोणतेही काम असो, एजंटाशी संपर्क केल्याशिवाय कामे हाेत नाहीत.

काम लवकर होतेमला वेळ नसतो, लायसन्स काढायचे आहे. अनेकवेळा स्वत: ड्रायव्हिंगसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करीन असे ठरवले होते. परंतु, कामात व्यस्त असल्याने शेवटी एजंटाकडे कागदपत्रे देऊन काम करून घेत आहे. थोडेफार पैसे जातात, परंतु काम लवकर होते.-संजय कोटुळे, व्यावसायिक बीड.

एजंटकडे कामे वेळेत होतातमी शेती करतो, त्यामुळे लायसन्स किंवा इतर कामांसाठी कसा व कोठे अर्ज करायचा याची काहीच माहिती नाही. मुलाने एका एजंटाचा नंबर दिला होता. त्याचा शोध घेत आहे. एजंटकडे कागदपत्रे दिली की मोकळा होईल. एजंटकडे दिली की कामे वेळेत होतात.-सखाराम काळे, शेतकरी, बीड.

अर्ज भरणे अवघड नाहीआरटीओमध्ये गेल्यानंतर कोणताही अर्ज भरणे अवघड नाही. परंतु, अनेकांना याची माहिती नसते. कधी प्रयत्न करत नसल्याने त्यांना कागदपत्रांची प्रक्रिया कशी करायची हे माहीत नसते. सर्वसामान्य नागरिकही स्वत: या ठिकाणी आपल्या कामासंदर्भाने अर्ज दाखल करू शकतो.-धनंजय जाधव, शिक्षक, बीड.

सोपी प्रणाली आहे आरटीओमध्ये कोणत्याही कामासाठी एजंटची मदत घेण्याची गरज नाही. ऑनलाइन प्रणाली एकदम सोपी असून, सर्वसामान्य नागरिक आरटीओमध्ये जनसंपर्क अधिकाऱ्याची मदत घेऊ शकतात.-स्वप्निल माने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसBeedबीड