शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कराडचा कोठडीतला मुक्काम लांबणार का?, सीआयडी अधिकारी उद्या कोर्टात हजर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 05:14 IST

सीआयडीच्या तपासात कराडवर आणखी कोणती संक्रांत येणार हे १४ जानेवारीला स्पष्ट होईल.

बीड : खंडणी प्रकरणात गेल्या तेरा दिवसांपासून पोलिस कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याला मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्यांवर कराड याचा कोठडीतील मुक्काम थांबणार की लांबणार, हे ठरणार आहे. सीआयडीच्या तपासात कराडवर आणखी कोणती संक्रांत येणार हे १४ जानेवारीला स्पष्ट होईल.

२९ नोव्हेंबरला मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मीक कराड याच्यावर गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याचा तपास सीआयडीचे अधिकारी करत आहेत. या गुन्ह्यात वाल्मीक कराड याला १४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बीड शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत गेल्या तेरा दिवसांपासून त्याची चौकशी सुरू आहे. वाल्मीक कराड याला मंगळवारी मकर संक्रांतीला न्यायालयात हजर करणार आहे.

दररोज दोन तास चौकशीवाल्मीक कराड याची खंडणी प्रकरणात सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या तेरा दिवसांपासून दररोज दोन तास चौकशी केली. उर्वरित २२ तास कराड यास शहर बीड पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये बंद करून ठेवलेजात होते.

पोलिस अधिकाऱ्याची २४ तास ड्यूटीवाल्मीक कराड याला बीड शहर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी सीआयडीचे दोन अधिकारी कायम तैनात आहेत. त्याचबरोबर त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी शहरातील विविध पोलिस ठाण्यांतील दररोज एका अधिकाऱ्याला २४ तास ड्यूटी लावण्यात आली आहे.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण