‘जैविक’चा धोका
अंबाजोगाई : बहुतांश खासगी रुग्णालये मुख्य रस्त्यावर जैविक कचरा रस्त्यावर टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सुविधा मिळेनात
नेकनूर : येथील आठवडी बाजार दर रविवारी भरतो. लाॅकडाऊन कालावधीत हा बाजार बंद होता. निर्बंध उठल्यानंतर पुन्हा एकदा बाजार भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बाजार सुरू झाला असून, असुविधेमुळे भाजी विक्रेत्यांची गैरसोय होत आहे.
इंटरनेट सेवा मिळेना
बीड : काही दिवसांपासून बीड शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. संबंधित विभागाकडे अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या, परंतु याची दखल घेतली जात नसल्याचे दिसते.
दलालांचा सुळसुळाट
अंबाजोगाई : सामान्यांची कामे तातडीने व्हावीत, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येते, पण अंबाजोगाई तहसील कार्यालयात मात्र, दलालांची मोठी गर्दी वाढल्याने सामान्य माणसाला साध्या कामासाठीही हेलपाटे मारावे लागतात.
सिग्नल बंद अवस्थेत
बीड : शहरातील मुख्य चौकात उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. ही सिग्नल व्यवस्था बंद असल्यामुळे सुरू करण्याची मागणी होती, परंतु दुरुस्ती झालेली नाही.