शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
2
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
3
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
4
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
5
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
6
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
7
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
9
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
10
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
11
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
12
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
14
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
15
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
16
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
17
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
18
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
19
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
20
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?

Wafq Land Scam: अबब ! १५ कोटींचा मावेजा आलेल्या जमिनीची सव्वा कोटींत विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 19:21 IST

Wafq Land Scam: वक्फ बोर्ड जमीन गैरव्यवहार, हवाला रॅकेटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार

बीड : वक्फ बोर्डच्या ४०९ एकरच्या ( Wafq Land Scam ) गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उजेडात येण्यास सुरुवात झाली आहे. यातील दहा एकर जमीन धुळे-सोलापूर महामार्गाला चिकटून आहे. चौपदरीकरणात सुमारे १५ कोटींचा मावेजा आला होता. तो ढापण्यासाठी अवघ्या सव्वा कोटी रुपयांत वक्फ बोर्डची जमीन खालसा करुन खासगी लोकांच्या घशात घातल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हवाला रॅकेटच्या माध्यमातून हा आर्थिक व्यवहार झाल्याचा आराेप आहे.

वक्फ बोर्ड अंतर्गत हजरत शहनशाहवली दर्गाची निजामकाळापासून ७९६ एकर ३७ गुंठे जमीन आहे. यापैकी काही जमिनी खिदमतमाश म्हणून सेवेकऱ्यांना दिलेल्या आहेत. मात्र, २०१६ मध्ये बनावट कागदपत्रे तयार करुन मूळ सातबारावरील दर्गाचे नाव कमी करुन त्या ठिकाणी हबीबोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी (रा. सिडको एन १२ प्लॉट क्र. १४ औरंगाबाद) व त्याच्या इतर नातेवाइकांच्या नावे केली. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ साठी दर्गाची सर्व्हे क्र. २२ व ९५ मधील जमीन संपादित केली होती. तेथे दर्गाची एकूण दहा एकर जमीन आहे. मावेजापोटी १५ कोटी रुपये आले होते. ते हडप करण्यासाठी संपूर्ण दहा एकर जमीन अवघ्या एक कोटी ३० लाख रुपयांत हबीबोद्दीन सिध्दीकी व इतरांना विक्री केली गेली. हा सगळा गैरव्यवहार तत्कालीन उपजिल्हाधिकारी (भूसुधार) प्रकाश आघाव पाटील , तत्कालीन तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांशी संगनमत करुन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ज्या जमिनीचा भूसंपादनाचा मावेजाच १५ कोटी आला आहे ती अवघ्या सव्वा कोटी रुपयांत खासगी लोकांच्या घशात घातल्याचे उघड झाल्याने हा घोटाळा नियोजनपूर्वक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपींचे पोलिसांना असहकार्यआर्थिक गुन्हे शाखेचे पो.नि. व तपास अधिकारी हरिभाऊ खाडे यांनी तपासकामी २ रोजी समक्ष हजर रहा, अशी नोटीस आरोपींना बजावली होती. मात्र, एकही आरोपी चौकशीसाठी पुढे आला नाही. केवळ तिघांचे नातेवाईक कागदपत्रे घेऊन आले होते. यातून आरोपींचे पोलिसांना असहकार्य असल्याचे समोर स्पष्ट झाले आहे.

तपास सुरु आहे या घोटाळ्याच्या अनुषंगाने महसूल विभागाकडे काही कागदपत्रे मागितलेली आहेत. ती सोमवारपर्यंत येतील, अशी अपेक्षा आहे. वक्फची बीडसह गेवराई व माजलगाव तालुक्यात जमीन आहे. तेथील कागदपत्रेही मागवली आहेत. सखोल तपास सुरू आहे.- संतोष वाळके, उपअधीक्षक, बीड.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड