शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गावकारभाऱ्यांना चांगलाच दणका; बीड जिल्ह्यातील २४ सरपंच अन् ८२० सदस्यांचे सदस्यत्व रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:16 IST

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाई सत्र सुरूच आहे; सदस्यत्व रद्दचा काय आहे नियम?

बीड : जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी २० जानेवारी रोजी बीड जिल्ह्यात ७ तालुक्यातील १३ सरपंच, तर ४१८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. त्यानंतर आता पुन्हा कारवाई करत ४ तालुक्यांतील ११ सरपंच व ४०२ सदस्यांचे सदस्यत्व ३१ जानेवारी रोजी रद्द केले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील गावकारभाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.

ग्रामपंचायत निवडणूक लढविणे व त्यातून जिंकणे हे फार मोठे यश असते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी असते, ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग घेऊन निवडून येणे हा प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. त्यामुळे इतर निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायत निवडणुकांची रंगत वेगळी असते. ग्रामपंचायत निवडणूक लढविताना अनेकांकडे जात प्रमाणपत्र नसते. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारास निवडून आल्यानंतर आपले जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी एक वर्षाची मुदत असते, परंतु अनेकजणांना आपली वंशावळ व इतर कागदपत्रे सादर करता येत नाही. परिणामी जात पडताळणी वैधता प्रमाणापत्र मिळत नाही. वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने अनेकांना आपले सरपंच किंवा सदस्यत्व गमावण्याची वेळ येते. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील सरपंच व सदस्य अशा एकूण ८४४ जणांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. ज्यांचे काही आक्षेप असतील त्याच्या सुनावण्या घेऊन निकाली काढण्यात येणार असल्याचे समजते.

काय आहे नियम ?अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांकापासून ते १२ महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. परंतु, २०२० ते २०२५ या कालावधीत झालेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर केले नाहीत.

पैसा व मेहनत गेली पाण्यातआजच्या काळात ग्रामपंचायत निवडणूक लढविणे ही साधी बाब राहिली नाही. ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारास पाच वर्षांपासून तयारी करावी लागते, त्यासाठी प्रत्येक गावकऱ्याच्या संपर्कात राहावे लागते. सर्वांच्या सुख-दुख:मध्ये सहभागी व्हावे लागते. वेळ प्रसंगी स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करून ग्रामस्थांची कामे करावी लागतात. निवडणूक लागल्यानंतर पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. अशा एक ना अनेक बाबींना तोंड देऊन सदस्य निवडून येतात. परंतु, जे ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून येतात त्यांना वेळेत आपले कास्ट व्हॅलिडीटी सादर करावी लागते अन्यथा निवडून आलेल्या सदस्यत्व रद्द होत आहे. परिणामी त्यांचा पैसा व मेहनत पाण्यात जाते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडCaste certificateजात प्रमाणपत्र