शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बाललैंगिक अत्याचारातील पीडितांसाठी मुंबईनंतर बीडमध्ये प्रथमच स्वतंत्र कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:30 IST

बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत पीडितांचे जबाब नोंदविण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार मुंबई महानगरानंतर प्रथमच जिल्ह्यात बीड येथील जिल्हा न्यायालयात नोंदणी कक्ष सुरू झाला.

बीड : बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत पीडितांचे जबाब नोंदविण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार मुंबई महानगरानंतर प्रथमच जिल्ह्यात बीड येथील जिल्हा न्यायालयात नोंदणी कक्ष सुरू झाला. न्यायिक बीड जिल्ह्याचे पालक न्या. रवींद्र घुगे, न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या उपस्थितीत या कक्षाचे शुक्रवारी उद्घाटन झाले. प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. हा जिल्ह्यातील पहिलाच कक्ष आहे.

बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली होती. त्यानुसार तुलनेने मागास असलेल्या जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकषास अनुसरून आणि बाललैंगिक अत्याचार निर्मूलन अधिनियमातील उद्देश विचारात ठेवून बीडमध्ये पीडितांचे जबाब नोंदणी कक्ष सुरू झाले. न्या. रवींद्र घुगे, न्या. एस. एम. गव्हाणे यांनी कक्ष निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. न्या. प्राची कुलकर्णी यांनी पुढाकार घेत सहभाग नोंदविला.

जिल्हा न्यायालय इमारतीत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच संबंधित कंत्राटदाराच्या मदतीने सर्व सोयींनीयुक्त सुसज्ज स्वतंत्र कक्ष खास पीडितांचे जबाब घेण्यासाठी निर्माण केला आहे.अत्याधुनिक सुविधाहा कक्ष सुरू झाल्यामुळे पिडीत बालकास व कोणत्याही दबाव अथवा प्रभावाखाली न येता निर्भयपणे साक्ष देण्याची योजना या कक्षाद्वारे फलद्रुप झाली आहे. या कक्षामध्ये अत्याधुनिक सीसी टिव्ही, संगणक, प्रिंटर, फर्निचर, बैठक व्यवस्था, आरोपीचे स्वतंत्र कक्ष, साक्षीदार कक्ष, लहान मुलांसाठी विविध खेळणी, चार्ट, प्रसाधन गृह, अंतर्गत सजावट या सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

टॅग्स :BeedबीडCourtन्यायालयRapeबलात्कारWomenमहिलाMarathwadaमराठवाडा