शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बीडमधील बालाजी मंदिरात मुक्ताईची पालखी विसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:02 IST

बीड : मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्री मुक्ताबाई पालखीने सोमवारी येथील माळीवेस हनुमान मंदिरात विसावा घेतल्यानंतर मंगळवारी आरती व हरिपाठानंतर पालखी सोहळ्याचे शहरातील पारंपरिक मार्गाने पेठेतील बालाजी मंदिराकडे प्रस्थान झाले.

बीड : मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्री मुक्ताबाई पालखीने सोमवारी येथील माळीवेस हनुमान मंदिरात विसावा घेतल्यानंतर मंगळवारी आरती व हरिपाठानंतर पालखी सोहळ्याचे शहरातील पारंपरिक मार्गाने पेठेतील बालाजी मंदिराकडे प्रस्थान झाले.

सोमवारी बीड शहरात आगमन व स्वागतानंतर पालखी हनुमान मंदिरात विसावली होती. दुपारपासून मंगळवारी सकाळपर्यंत भाविकांनी दर्शन घेतले. पालखीत सहभागी वारकऱ्यांचे स्थानिक भाविकांनी आदरातिथ्य केले. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आरतीनंतर संत मुक्ताई, हरिनामाचा गजर करत फुलांनी सजविलेल्या रथातून पालखी धोंडीपुºयातून मार्गस्थ झाली. शेकडो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.पालखीच्या अग्रभागी जनार्दन दोडके, देवीदास दोडके यांच्या बॅँड पथकांनी वातावरण प्रफुल्लीत केले.

देशभक्तीपर तसेच धार्मिक गितांच्या धुन भाविकांच्या कानी पडत होत्या. दोन्ही बॅँड पथक अनेक वर्षांपासून निस्सीम भक्ती आणि अपार श्रध्देपोटी पालखीच्या सेवेत वाद्यवृंदाच्या माध्यमातून सुरतालांची बरसात करत असतात.पाहुणचाराचा ‘आदर्श’संत श्री मुक्ताबाई पालखीतील वारकºयांसाठी शहरातील कबाड गल्लीतील भाविकांकडून महापंगत आयोजित केली जाते. १८५२ पासून मराठा पंच कमिटीच्या माध्यमातून सुरु असलेली अशी सेवा या भागातील तरुणांच्या आदर्श मित्र मंडळाने सुरु ठेवली आहे. बाळासाहेब जाधव, बंडू कदम, राजेंद्र सोळुंके, अशोक रोमण, संतोष जाधव, बाळासाहेब गोरे, बबन जाधव, बाळू कदम आदींच्या सहभागातून ३५० वारकरींच्या निवास व जेवणाची व्यवस्था केली जाते.

आरोग्य तपासणीबीड येथील कै. किसनराव जाधव सेवाभावी संस्थेच्या वतीने संत मुक्ताई पालखीतील वारकºयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. अजित जाधव, डॉ. सुहासिनी जाधव, डॉ. सतिश लड्डा, डॉ. धनंजय रामदासी, महेश कागदे यांनी रुग्णसेवा दिली. डॉ. रामदासी यांच्या वतीने मोफत औषधी देण्यात आली. संतोष जाधव, राहुल कागदे, पंकज खंडेलवाल, बाळु शिंदे, देवीसिंह शिंदे, नितीन दोडके, किशोर पिसाळ, आनंद गायकवाड, आतिश मेखे यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले

टॅग्स :BeedबीडPandharpur Wariपंढरपूर वारीMarathwadaमराठवाडा