शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘एआरटीओ’त ‘दक्षता’ची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:18 IST

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (एआरटीओ) तक्रारी मुख्यमंत्र्यापर्यंत गेल्या. याची गंभीर दखल घेत परिवहन विभागाच्या ‘दक्षता’ पथकाने बुधवारी दुपारी अचानक धाड टाकून आठ दलालांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून महत्वाचे कागदपत्रेही हस्तगत करण्यात आलेले आहेत. या धाडीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडील तक्रारींची दखल : महत्त्वाच्या कागदपत्रांसह बीडमध्ये आठ दलाल जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (एआरटीओ) तक्रारी मुख्यमंत्र्यापर्यंत गेल्या. याची गंभीर दखल घेत परिवहन विभागाच्या ‘दक्षता’ पथकाने बुधवारी दुपारी अचानक धाड टाकून आठ दलालांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून महत्वाचे कागदपत्रेही हस्तगत करण्यात आलेले आहेत. या धाडीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.बीडच्या एआरटीओ कार्यालयात मागील काही महिन्यांपासून ढिसाळ कारभार सुरू आहे. अधिकाऱ्यांपेक्षा येथे दलालांचेच राज्य असल्याचे वारंवार समोर आले आहे. येथील अधिकारीही या सर्व गैरप्रकारांकडे डोळेझाक करीत असल्याचे घडलेल्या घटनांवरून समोर आले. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत चालल्याने काही नागरिकांनी या कार्यालयाच्या आणि कार्यालयात सुरू असलेल्या गैरप्रकारांच्या तक्रारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या होत्या. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी परिवहन आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. त्याप्रमाणे बुधवारी दुपारी परिवहन विभागाचे दक्षता पथक बीडमध्ये धडकले. अचानक कार्यालयात धाड टाकून तब्बल आठ दलालांना महत्वाच्या कागदपत्रांसह ताब्यात घेतले.अचानक पडलेल्या धाडीमुळे कोणालाच तेथून पळ काढणे अशक्य होते. त्यामुळे ते जाळ्यात अडकले. ही धावपळ पाहून बाकीचे दलाल सावध झाले आणि आपले बस्तान तेथेच सोडून त्यांनी पलायन केले.जे दलाल कार्यालयात अनाधिकृतपणे घुसून गैरप्रकार करीत होते, तेच दलाल यामध्ये अडकल्याचे सूत्रांनी सांगितले. कारवाई करणाºया पथकात सहायक पोलीस आयुक्त (दक्षता) प्रशांत कोलवाडकर, आर.जी.घरसी, रावसाहेब वाघ यांच्यासह आठ लोकांचा सहभाग होता.वाहन निरीक्षकांची झाली धावपळकार्यालयातील गैरप्रकार चव्हाट्यावर आल्याचे समजताच वाहन तपासणीच्या नावाखाली ‘वसुली’ करणाºया वाहन निरीक्षकांची पाचावर बसली. त्यांनी तात्काळ कार्यालयात धाव घेतली. परंतु तोपर्यंत सर्व दलालांना बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले होते. या वाहन निरीक्षकांनी मग ठाणे गाठून दक्षता विभागाला माहिती दिली. माहिती देतानाही त्यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे दिसून आले.यापूर्वी मुंबई क्राईम ब्रांचची धाडसाधारण महिन्यापूर्वीच मुंबईच्या क्राईम ब्रांचच्या पथकाने या कार्यालयात धाड टाकली होती. यामध्ये एका दलालाला ताब्यात घेण्यात आले होते. सध्याही हा दलाल क्राईम ब्रांचच्या ताब्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता मंगळवारी पडलेल्या अचानक धाडीमुळे कार्यालयातील गलथान कारभार व अधिकाºयांचे होत असलेले दुर्लक्ष समोर आले आहे.वाहन निरीक्षकांचे कानावर हातया कारवाईदरम्यान, मोटार वाहन निरीक्षक सुशांत जाधव व सहायक वाहन मोटार निरीक्षक क्षीतिज व्यवहारे हे दोघेही बीड ग्रामीण ठाण्यात होते.दक्षताला माहिती देताना त्यांची चांगलीच धावपळ होत असल्याने ते घामाघुम झाल्याचे दिसले. माध्यमांनी विचारलेल्या एकाही प्रश्नांवर त्यांना उत्तर देता आले नाही. शेवटी त्यांनी एआरटीओ यांना विचारा, असे म्हणून कानावर हात ठेवले.एवढी मोठी कारवाई झालेली असताना निरीक्षकांना काहीच माहिती नसणे, हे आश्चर्य वाटणारे आहे.

टॅग्स :BeedबीडRto officeआरटीओ ऑफीसChief Ministerमुख्यमंत्री