शहरात जागोजागी नळाचे लीकेज काढण्यासाठी मोठमोठे खड्डे करण्यात येत आहेत. लीकेज काढल्यानंतर केलेले खड्डे व्यवस्थित भरण्याऐवजी थातुरमातुर भरली जात आहेत. यामुळे ही जागा भुसभुशीत होत आहे. या ठिकाणावरून एखादे वाहन गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी फसत आहे. मोंढ्यात तर मोठमोठे खड्डे थातुरमातुर भरल्याने माल घेऊन येणारी वाहने फसत आहे. फसलेले वाहन काढण्यासाठी संबंधित वाहनधारकांना जेसीबीचा सहारा घ्यावा लागत आहे. यासाठी वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दररोज मोंढ्यात वाहने फसत असताना व याबाबत नगरपालिकेडे तक्रार करूनही नगरपालिका दुर्लक्ष करताना दिसत आहे.
लीकेज काढणारांना नाही अनुभव
शहरात जागोजागी लीकेज काढण्याचे काम नगरपालिका गुत्तेदाराकडून करत आहे. हे काम करणाऱ्या मजुरांना लिकेज काढण्याचा अनुभव नसल्याचा पुन्हा-पुन्हा प्रत्यय येत आहे. ज्या ठिकाणचे लीकेज ते काढत आहेत, तेथे पाणी येताच, पुन्हा लीकेज होताना दिसत आहे. यामुळे एका जागेवरचे वारंवार लीकेज काढण्यात वेळ जातो आहे. यात नगरपालिकेला मोठा भुर्दंड बसताना दिसत आहे.
===Photopath===
050321\img_20210305_105426_14.jpg