शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वर्णी महापूजेने श्री योगेश्वरी देवी मार्गशीर्ष महोत्सव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 00:05 IST

अंबाजोगाई : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव ३ ते ११ डिसेंबर ...

ठळक मुद्देआराध बसण्यासाठी महिलांची गर्दी : सुविधांसाठी देवल समितीच्या वतीने उपाययोजना

अंबाजोगाई : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव ३ ते ११ डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. मंगळवारी सकाळी वर्णी महापूजेने मार्गशीर्ष महोत्सवास प्रारंभ झाला. तहसीलदार संतोष रूईकर व कमल संतोष रूईकर यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. या वर्णी महापूजेने या महोत्सवाची सुरूवात झाली.मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदिर परिसरात सलग नऊ दिवस आराध बसण्याची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. या वर्षी मंदिरात जवळपास ४ हजार महिला आराध बसल्याची माहिती देवल कमिटीच्या वतीने देण्यात आली.मंगळवारी सकाळी झालेल्या महापूजेनंतर महिलांची मंदिरात आराध बसण्यासाठी गर्दी वाढू लागली होती. शहरवासियांनी योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा केल्या होत्या. या वेळी झालेल्या महापूजेला तहसीलदार संतोष रूईकर व कमल रूईकर यांनी विधीवत योगेश्वरी देवीची महापूजा व महाआरती केली. यावेळी देवल कमिटीचे विश्वस्त भगवानराव शिंदे, मुख्य पुजारी सारंग पुजारी, योगेश्वरी देवीचे विश्वस्त कमलाकर चौसाळकर, माजी आ. पृथ्वीराज साठे, अ‍ॅड. शरद लोमटे, गिरीधारीलाल भराडिया, प्रा.अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, डॉ. संध्या जाधव, पूजा कुलकर्णी, गौरी जोशी यांच्यासह देवीचे पुरोहित, मानकरी व भक्त उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली.महोत्सवाच्या कालावधीत सलग नऊ दिवस विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन देवल कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच आराध बसलेल्या सर्व महिलांच्या निवासाची, पाण्याची व त्यांना मूलभूत गरजा पुरवण्यासाठी देवल कमिटीच्या वतीने उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, अशी माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार संतोष रूईकर यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम