शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मतांचा फटका राष्ट्रवादीला ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 14:58 IST

या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसह जवळपास आठ नोंदणीकृत पक्षही रिंगणात उतरले आहेत.

- सतीश जोशी

बीड : जयसिंग गायकवाड हे १९९९ साली भाजपकडून, तर २००४ साली राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. त्यानंतर २००९ आणि २०१४ साली भाजपचे गोपीनाथराव मुंडे तर २०१४ च्या पोटनिवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे या, तर जवळपास सात लाखांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. 

२००९ आणि २०१४ च्या निवडणुकीचा अभ्यास केला तर गोपीनाथरावांना मिळालेली मतांची टक्केवारी जवळपास ५२ टक्के म्हणजे झालेल्या एकूण मतांच्या निम्म्याहून अधिक आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश आडसकरांना ३८ टक्के तर २०१४ मध्ये सुरेश धस यांना जवळपास ४० टक्के मते मिळाली होती. याचाच अर्थ गोपीनाथराव हे २००९ मध्ये १३ टक्के आणि २०१४ मध्ये ११ टक्के अधिक मतांनी विजयी झाले होते. 

ज्या पक्षांचा मुस्लीम आणि मागासवर्गीय मतांवर अधिक प्रभाव आहे, त्या बसपाला २००९ मध्ये २.३५ टक्के म्हणजे २५२८४ मते, भारीप बहुजन महासंघाचे कचरू खळगे यांना १ टक्का म्हणजे ११, ००६  मते मिळाली.  २०१४ साली बसपाला १.१५ टक्के म्हणजे १४१६६ मते मिळाली. गोपीनाथराव हे २००९ मध्ये १,४०,९५२ मतांनी तर २०१४ साली १,३६,४५४ मतांनी विजयी झाले होते. भाजपची मतांची टक्केवारी वाढत असून २०१४ च्या पोटनिवडणुकीत तर ७१ टक्क्यांपर्यंत विक्रमी वाढ झाली होती.

बीड लोकसभा मतदारसंघात २००४ चा एकमेव अपवाद वगळला तर गेल्या पाच निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळविला आहे.  या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसह जवळपास आठ नोंदणीकृत पक्षही रिंगणात उतरले आहेत. या पक्षांना मिळणारी मते ही बहुतांश भाजपविरोधी आहेत. या मतांचा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास फटका बसणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019beed-pcबीड