शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यनाथाची दसरा पालखी परिक्रमा पाच मानकऱ्यांसह निघणार; जिल्हाधिकाऱ्यांची अटीसह परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 14:09 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीमुळे पारंपारिक परिक्रमा खंडित होणार नाही, यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

ठळक मुद्देपरिक्रमा मिरवणूक वाहनातून काढण्यात येणार यावेळी केवळ पाच मानकऱ्यांची उपस्थिती राहणार आहे

परळी : पारंपारिक पद्धतीने दसऱ्याच्या दिवशी होणारा सीमोल्लंघनचा सोहळा कोरोनाचा प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर करण्यास मर्यादा आली आहे. मात्र, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दसऱ्याच्या दिवशी प्रभू वैद्यनाथाची पालखी मिरवणूक परिक्रमेस काही अटीसह परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अटीचे पालनकरून दसरा परिक्रमा पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने हा पारंपारिक सोहळा खंडित होणार नाही यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या परवानगीनुसार श्री प्रभू वैद्यनाथाची पालखी मिरवणूक परिक्रमा वाहनातून पाच मानकऱ्यांच्या सहभागाने करावी. यावेळी वाहन कुठेही न थांबवता कमीत कमी वेळेत परिक्रमा पूर्ण करावी. पाचपेक्षा जास्त भाविकांनी व मानकरी यांनी गर्दी करू नये. संसर्गजन्य स्थिती असल्याने या अटीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी शुक्रवारी श्री वैजनाथ मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांना दिल्या आहेत. यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सीमोल्लंघन स्थळी गर्दी करू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. 

असा आहे दसऱ्याचा पारंपारिक सोहळादसऱ्याला पारंपारिक पद्धतीने श्री प्रभू वैद्यनाथाची पालखी काढून सीमोल्लंघन सोहळा आयोजित केला जातो .यामध्ये श्री प्रभू वैद्यनाथाची पालखी येथील  वैद्यनाथ मंदिरातून सायंकाळी पाचच्या सुमारास वाजंत्रीसह निघते. पालखी देशमुख पार्, आंबेवेस, गणेशपारमार्गे कालरात्री देवी मंदिर येथे जाते .कालरात्री देवी मंदिर परिसरात वैद्यनाथाच्या पालखीचे आतिषबाजी करून स्वागत केले जाते. श्री प्रभू वैद्यनाथाच्या पालखीसोबत कालरात्रीदेवीची सुद्धा पालखी निघते. यानंतर या दोन्ही पालख्या श्री बटुभैरव मंदिराकडे प्रस्थान होतात. सीमोल्लंघनस्थळी  जाऊन  शहराचे सीमोल्लंघन  करतात. या दोन्ही पालख्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात पाच परिक्रमा पालखी घेऊन मानकरी करतात. पाच परिक्रमा झाल्यास श्री प्रभू वैद्यनाथाची  पालखी  वैद्यनाथ मंदिरात थांबते आणि  कालरात्री देवीची पालखी मंदिराकडे प्रस्थान करते. या परंपरागत पद्धतीने दसऱ्याला सीमोल्लंघनचा सोहळा साजरा केला जातो. यावर्षी पारंपारिक पद्धतीने हा सोहळा होणार नाही मात्र जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्याने पालखी परिक्रमा खंडित होणार नाही याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.  

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडDasaraदसरा