शहरातील संजयनगर भागात वडार समाज मोठ्या संख्येने असून या समाजासाठी शहरामध्ये स्मशानभूमीची केवळ जागा उपलब्ध आहे. त्यामुळे अंत्यविधी करण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत. वडार समाजाला नगर परिषदेच्या हद्दीमध्ये गट क्र. ५८० (अ) मध्ये स्मशानभूमीसाठी २० गुंठे जमीन आहे. मात्र, स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत. या ठिकाणी स्मशानभूमीसाठी संरक्षक भिंत, विंधन विहीर, रस्ता व विजेची सोय नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. स्मशानभूमीतील कामांची वारंवार मागणी करुनही अद्यापपर्यंत त्याची नोंद न घेतल्याने वडार समाजाचे तालुकाध्यक्ष सुभाष गुंजाळ, विलास गुंजाळ, प्रकाश उपळकर, अर्जुन गुंजाळ, पंढरिनाथ मोरे, अमोल पवार,प्रकाश गुंजाळ, मोहन गुंजाळ,कैलास गुंजाळ, रमेश चव्हाण,शिवाजी गुंजाळ आदींसह महिलांनी उपोषण केले.
स्मशानभूमीत सुविधांसाठी वडार समाजाचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST