शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे आरोग्य विभाग पडला ‘आजारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 23:56 IST

सोमनाथ खताळ। लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्हा रुग्णालय व अधिनस्त असलेल्या आरोग्य संस्थेतील वर्ग १ ते ४ पर्यंतची ...

ठळक मुद्देबीड जिल्हा रुग्णालय आस्थापना : वर्ग १ ची ४४ पैकी केवळ १० पदे भरलेली; कामकाज कसे चालणार ?

सोमनाथ खताळ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा रुग्णालय व अधिनस्त असलेल्या आरोग्य संस्थेतील वर्ग १ ते ४ पर्यंतची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे आहे त्या यंत्रणेवर कामाचा ताण वाढत आहे. यंत्रणा चालविणारे अधीक्षकासह इतर वर्ग १ ची ४४ पैकी केवळ १० च पदे भरलेली आहेत. त्यामुळे आहे त्या यंत्रणेवर उपचार करताना ताण वाढत आहे. या रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणाचा ‘आजारी’ पडल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या अधिकारात जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालये आणि नेकनूरचे स्त्री रुग्णालय येते. या संस्थांमध्ये सामान्य नागरिक आल्यावर त्याच्यावर उपचार करताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात वर्ग १ च्या ४४ जागा आहेत. जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, बालरोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधीक्षक अशी २० पैकी केवळ पाचच पदे भरलेली आहेत. तसेच ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयातही २४ पैकी केवळ पाच पदे भरलेली आहेत. चिंचवण, माजलगाव, नांदूरघाट, नेकनूर, परळी येथेच वर्ग १ ची पदे भरलेली आहेत. इतर १९ पदे रिक्त आहेत.ही सर्व पदे यंत्रण चालविणारे आहेत. मात्र, हेच रिक्त असल्याने इतरांकडे पदभार देऊन कारभार चालविला जात आहे. जवळपास आरोग्य संस्थांमध्ये प्रभारीच कारभारी बनल्याचे दिसून येत आहे.वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांवर ताणवर्ग ३ मध्ये परिसेविका, परिचारीका, आधिसेविका, पाठ्य निर्देशक, वरिष्ठ लिपीक अशी विविध ४१ प्रकारचे पदे आहेत. जिल्ह्यात ४४२ पैकी तब्बल १४१ पदे आजही रिक्त आहेत. तसेच वर्ग २ ची १४५ पैकी १२५ पदे भरलेली आहेत. वर्ग ४ ची ४१३ पैकी १०९ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.३ नव्हे तर २० रूग्णांमागे १ परिचारिकाजिल्हा रुग्णालय हे ३२० खाटांचे आहे. मात्र, येथील दाखल होणाºया रुग्णांची संख्या दुप्पट असते. नियमानुसार ३ रुग्णांमागे एक परिचारिका असावी. मात्र, रुग्णालयात २० पेक्षा जास्त रुग्णांची सेवा एका परिचारीकेला करावी लागत आहे. त्यामुळे चिडचिड, वाद असे प्रकार होत आहेत.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड