शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे ‘एआरटीओ’ची कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 23:53 IST

येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात (एआरटीओ) सध्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामे खोळंबली आहेत. ४६ पैकी केवळ १८ कर्मचारी कार्यरत असून २८ रिक्त आहेत.

ठळक मुद्दे४६ पैकी १८ कार्यरत : उपप्रादेशिक, सहायक परिवहन अधिकारी व वाहन निरीक्षकांचा समावेश

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात (एआरटीओ) सध्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामे खोळंबली आहेत. ४६ पैकी केवळ १८ कर्मचारी कार्यरत असून २८ रिक्त आहेत. यामध्ये उपप्रादेशिक, सहायक परिवहन अधिकाऱ्यांसह वाहन निरीक्षक, सहायक निरीक्षकांचा समावेश आहे. महत्त्वाचीच पदे रिक्त असल्याने सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आहे त्या अधिकारी, कर्मचा-यांवर कामाचा ताण वाढत आहे.बीडच्या एआरटीओ कार्यालयात शिपाई ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची ४६ पदे आहेत. परंतु मागील काही वर्षांपासून अधिकारी, कर्मचाºयांची वाणवा कायम आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक परिवहन अधिकारी, वाहन निरीक्षक, सहायक वाहन निरीक्षक अशा अधिकाºयांची मुख्य पदेच रिक्त असल्याने वाहन नोंदणी, वाहन विकल्यानंतरची प्रक्रिया, वाहन चालविण्याचा परवाना, वाहन तपासणी आदी कामे खोळंबत आहेत. नागरिकांना एका कामासाठी चार चार वेळेस खेटे मारावे लागत आहेत. त्यातच उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांचे पद रिक्त असल्याने ११ जुलै २०१९ पासून बीडचा पदभार औरंगाबादचे संजय मेत्रेवार यांच्याकडे सोपविण्यात आला. आठवड्यातून दोन ते तीन वेळाच त्यांचा बीड दौरा होत असल्यानेही अनंत अडचणी येत आहेत. त्यामुळे ही पदे भरावीत, अशी मागणी सामान्यांमधून होत आहे.सहायक निरीक्षक मिळाले, पण प्रशिक्षणार्थीचबीडच्या कार्यालयात सहायक वाहन निरीक्षकांची २० पदे मंजूर आहेत. पैकी ९ लोक कार्यरत असून ११ रिक्त आहेत. परंतु जे नऊ लोक आहेत, ते सर्व प्रशिक्षणार्थी आहेत. त्यांचा कामकाजात फारसा उपयोग होत नाही. किमान दोन वर्षे त्यांचा हा कालावधी असतो. त्यानंतरच ते नियमित कामास उपयोगी येतील, असेही मेत्रेवार यांनी सांगितले. हे सर्व लोक चार महिन्यांपूर्वीच रूजू झाले आहेत. वाहन तपासणीस, लेखापाल ग्रामीण, वरिष्ठ लिपीक, हवालदार, वाहन चालक, शिपाई, पहारेकरी यांची पदेही रिक्त आहेत.

अपु-या मनुष्यबळामुळे कामे करताना अडचणी येत असल्या तरी त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातात. सामान्यांची कामे खोळंबू नयेत, तात्काळ व्हावीत, यासाठी वारंवार सुचना केल्या जातात. वाहन निरीक्षक कमी असल्याने औरंगाबादहून दोघे बोलावले जातात. आणखी सुधारणा करण्यात येईल. रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठांडे वारंवार पाठपुरावा केला जातो.- संजय मेत्रेवार,प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड

टॅग्स :BeedबीडRto officeआरटीओ ऑफीस