शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

४५५३ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवर कार्यवाही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:37 IST

बीड : राज्यात वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून पात्र असतानाही पदोन्नती मिळालेली नाही. याबाबत ‘लोकमत’ने ...

ठळक मुद्देवर्ग ३ व ४ : राज्यातील सर्व उपसंचालकांना संचालकांच्या सूचना

बीड : राज्यात वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून पात्र असतानाही पदोन्नती मिळालेली नाही. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून हा प्रकार निदर्शनास आणला होता. यावर आरोग्य विभागाच्या संचालकांनी सर्व उपसंचालकांना पत्र काढून १५ मार्च पर्यंत राज्यातील ४ हजार ५५३ कर्मचा-यांच्या पदोन्नतीवर सर्व कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.महाराष्ट्रात गट ड व क ची पदे मोठ्या प्रमाणात आहे. गट ड मधून क मध्ये व क मधून क मध्येच परंतु वरच्या पदावर पदोन्नतीने जाण्यास पात्र असणाºयांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. ही प्रक्रिया मागील अनेक महिन्यांपासून रखडली होती. आरोग्य विभागातील वर्ग चार ते वर्ग १ पर्यंतच्या सर्वच अधिकारी, कर्मचा-यांच्या पदोन्नतीवर ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित करून प्रकाश टाकलेला आहे. यात लातूर परिमंडळातील वर्ग तीन च्या कर्मचा-यांना ‘लोकमत’मुळे पदोन्नत्या मिळाल्या होत्या.परंतु गट ड व क च्या कर्मचाºयांचा प्रश्न रखडला होता. यावरही प्रकाश टाकताच आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी दखल घेत राज्यातील सर्व उपसंचालकांना पत्र काढून याबाबत १५ मार्चपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे कर्मचा-यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून समाधान व्यक्त होत आहे. या कारवाईला तात्काळ सुरूवात करून पदोन्नत्या देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.दरम्यान, २८ फेब्रुवारीला अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ५ मार्चला गोपनीय अहवाल संकलन, १० मार्चला विचार क्षेत्रातील कर्मचाºयांचा सेवा विषयक तपशील संकलित करणे, १२ मार्चला रिक्त पदांची संख्या खुला व मागास वर्ग पदसंख्या निश्चित करणे, १४ मार्चला विभागीय पदोन्नती समितीची बैठक आयोजित करणे आणि १५ मार्चला पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्याच्या सूचना पत्राद्वारे केल्या आहेत.‘लोकमत’मुळे आरोग्य विभागाचे प्रश्न मार्गीआरोग्य विभागातील रिक्त जागा, पदोन्नत्या याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित केलेले आहेत. याची आरोग्य विभागाने दखल घेत डॉक्टर, कर्मचाºयांची पदे भरण्यासह पदोन्नत्या केल्या आहेत. आता आरोग्य सेवा संचालकांनी राज्यातील ४ हजार ५५३ कर्मचा-यांच्या पदोन्नतीवर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्याने समाधान व्यक्त होत आहे. ‘लोकमत’चे आभारही व्यक्त केले जात आहेत.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलEmployeeकर्मचारीState Governmentराज्य सरकार