शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उसतोड मजूर, मुकादमांच्या अडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 23:47 IST

ऊसतोड कामगारांशिवाय गुलाल लागत नाही हा इतिहास असल्याचा विश्वास बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : मांजरसुंबा येथे उसतोड मजुरांची बैठक

मांजरसुंबा : ऊसतोड कामगारांशिवाय गुलाल लागत नाही हा इतिहास असल्याचा विश्वास बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला. बालाघाटावरील मांजरसुंबा येथे मुकादम आणि ऊसतोड कामगारांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत कोयता उंचावून उसतोड कामगारांनी धनुष्यबाणाला साथ देण्याचा निर्णय घेतला. यावेळी ऊस तोडणी कामगार महामंडळाचे अध्यक्ष केशवराव आंधळे, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, श्रीमंत जायभाये, गोरख रसाळ, राणा डोईफोडे आदी उपस्थित होते.जयदत्त क्षीरसागर म्हणाले, बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांचा आशिर्वाद असल्याशिवाय गुलाल लागत नाही हा इतिहास आहे. सोशल मिडियावर अफवा पसरविण्याचे काम सध्या विरोधक करत आहेत. त्यांना काय करायचे ते करू द्या, आपण आपली दिशा ठरवून काम करूया. २४ तारखेला त्यांचा सामुदायिक रडण्याचा कार्यक्रम होईल हे नक्की. मुकादम संघटना आणि ऊसतोड कामगार माझ्या पाठीशी उभी राहिली त्यामुळे मला मोठे मताधिक्य मिळेल यात दुमत नाही. धनुष्यबाणाला मतदान करून मला पाठबळ द्या असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी केले.लालासाहेब घुगे यांनी ऊसतोड मुकादम संघटनेला भविष्यात मदत व्हावी, त्यांचे प्रश्न सोडवावेत त्यासाठी जयदत्त क्षीरसागरांचे पाठबळ आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले तर माजी आ. केशवराव आंधळे म्हणाले, ऊसतोड कामगार आणि मुकादमांची बैठक होत असते. या बैठकीत निर्णय ठरतो आणि त्या निर्णयाप्रमाणे आम्ही उमेदवार निवडत असतो. आता आमचे ठरले आहे. शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर हेच आपले उमेदवार आहेत. त्यांना निवडून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे ते म्हणाले. यावेळी दत्तोबा भांगे, नितीन धांडे, रतन गुजर आदी उपस्थित होते.पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या प्रकल्पाची गरजऊसतोड कामगार आणि संघटनेच्या भविष्यात अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सकारात्मक भूमिका ठेऊ. पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. तो सुटणे काळाची गरज आहे. त्यासाठी मोठे प्रकल्प होणे आवश्यक आहेत. म्हणूनच केंद्रात आणि राज्यात जे सरकार येणार आहे त्या सरकारमध्ये आपण सहभागी झाले पाहिजे, अशी भूमिका मांडत जयदत्त क्षीरसागर यांनी मतदारसंघात भविष्यामध्ये कराव्या लागणाऱ्या विकासकामांची माहिती दिली.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना