शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत ‘वेदनाविरहित’ प्रसुतीचा ‘स्वाराती’मध्ये प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:54 IST

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील भूलतज्ज्ञ तथा सहायक प्राध्यापिका डॉ. अपर्णा कुलकर्णी व डॉ. राजश्री धाकडे यांनी एका महिलेची वेदनाविरहित प्रसुती यशस्वी केली. बीड जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रसुतीसाठी खाजगी रुग्णालयात मोठा खर्च आकारला जातो. मात्र, स्वारातीमध्ये अशी प्रसुती मोफत करण्यात येते.

ठळक मुद्देगरीब रुग्णांसाठी पद्धत ठरणार फायद्याची

अविनाश मुडेगावकर।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील भूलतज्ज्ञ तथा सहायक प्राध्यापिका डॉ. अपर्णा कुलकर्णी व डॉ. राजश्री धाकडे यांनी एका महिलेची वेदनाविरहित प्रसुती यशस्वी केली. बीड जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रसुतीसाठी खाजगी रुग्णालयात मोठा खर्च आकारला जातो. मात्र, स्वारातीमध्ये अशी प्रसुती मोफत करण्यात येते.

सामान्य रुग्णांचे आधारकेंद्र असलेल्या येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील अनस्थेशिया विभागाच्या वतीने वेदना विरहित प्रसुतीचा प्रयोग करण्यात आला. बाळंतपणात अनेक यातना महिलेस सहन कराव्या लागतात. मात्र, वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित झाले आहे. वेदना विरहित प्रसुती ही नवीन उपचार पद्धती पुढे आली. हे उपचार प्रामुख्याने मुंबई, पुणे मोठ्या शहरातच होतात.

अशा प्रसुतीसाठी खाजगी रुग्णालयाकडून किमान १ लाख रुपयांपर्यंत रक्कम आकारली जाते. ही सुविधा महागडी असल्याने व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने अशा प्रसुती इकडच्या होत नाहीत.

अंबाजोगाई व परिसरातील सामान्य कुटुंबातील महिला रुग्णांनाही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी येथील भूलतज्ज्ञ डॉ. अपर्णा प्रसाद कुलकर्णी व डॉ. राजश्री राहुल धाकडे यांनी विभागप्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात दाखल एका महिलेची वेदनाविरहित प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी प्रसुती यशस्वी पार पाडली.

यासाठी स्त्रीरोग व प्रसुतीविभागाचे डॉ. गणेश तोंडगे, डॉ. अपूर्वा, डॉ.वर्षा, डॉ. तेजस्विनी तर अ‍ॅनेस्थेशिया विभागाचे डॉ. रविराज, डॉ. शीतल यांनी सहकार्य केले. यशस्वी उपक्रमाबद्दल स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. अभिमन्यू तरकसे, डॉ. गणेश निकम, डॉ. प्रसाद, डॉ. प्रेरणा, डॉ. पवार, यांनी स्वागत केले आहे.वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाºया पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अशा विविध उपक्रमातून नवीन दिशा मिळते. तयार होणारे डॉक्टर रुग्णसेवेसाठी तरबेज होतात. अशी प्रतिक्रिया अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.