शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नगरविकास खात्याने माजलगाव नगरपालिकेच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 17:18 IST

प्रत्येक खर्चास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता बंधनकारक

ठळक मुद्दे मागील ३ वर्षाच्या काळात नगर विकास खात्याकडे अपहाराच्या अनेक तक्रारी नगर विकास खात्याच्या ४ सदस्यांच्या समितीच्या अहवालानुसार कारवाई

माजलगाव (बीड ) : येथील नगरपालिकामध्ये मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या मनमानी व गैरकारभाराची आता थेट राज्याच्या नगर विकास खात्याने दखल घेतली आहे.  नगरपालिकेस शासनाकडून आलेल्या सर्व प्रकारच्या अनुदानामधुन एक रूपयाही खर्च करायचा असेल तर त्यासाठी नगरपालिकेने जिल्हाधिकारी यांची मान्यता घेणे बंधनकारक असल्याचा आदेश नगरविकास खात्याने बजावला आहे. हा निर्णया नगरपालिका पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का मानला जात आहे.

माजलगाव नगरपालिकेत मागील ३ वर्षाच्या काळात तत्कालीन मुख्याधिकारी बी. सी. गावित व लक्ष्मण राठोड यांनी कोटयवधी रूपयांची कामे कागदपत्री दर्शवून मोठया प्रमाणावर अपहार केल्याच्या तक्रारी थेट नगरविकास खात्याकडे दाखल होत्या.त्या अनुषंगाने नगर विकास खात्याचे आयुक्त यांच्या मार्फत या गैरकारभाराची चौकशी करण्यात आली. या चौकशी समितीवर नगर विकास खात्याने चार सदस्यांची नियुक्ती केली होती. या समितीने तब्बल एक महिना कसून चौकशी करून आपला अहवाल नगरविकास संचालनालयास सादर केला. 

या अहवालाच्या आधारे आदेशीत करण्यात आलेले नगर पालिकेचे विषेश लेखा परिक्षण होऊन त्यासंदर्भात शासनाने आता येथील नगरपालिकेच्या गैरकारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर पालिकेस शासनाकडून आलेल्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या अनुदानामधुन कोणताही खर्च करायचा असेल तर नगर पालिकेने जिल्हाधिकारी यांची मान्यता बंधनकारक असल्याचे आदेश नगर विकास खात्याने 21 आँगष्ट रोजी प्र.क्र.92 क्र.संकीर्ण 2019 नुसार खात्याचे सहसचिव पा.जो.जाधव यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले असुन शासनाच्या पुढील आदेशापर्यंत अंमलबजावणी जिल्हाधिकारी यांनी करावी असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे.

पालकमंत्री मुंडे यांच्याकडे तक्रारी माजलगाव नगरपालिकेच्या विविध विकास कामासाठी शासनाने दिलेले 20-30 कोटी रुपये नगरपालिकेच्या खात्यामध्ये अनेक वर्षापासून पडून असतांना विकास कामे करण्यात चाल ढकल सुरू होती. त्यामुळे काही नगरसेवक व भाजप पदाधिकाऱ्यांनी  पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर नगरपालिकेला आलेल्या विविध फंडातील जवळपास 12 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळवण्यात आले आहेत.तर नगरपालिकास खात्यानेवरील निर्गमित केलेले आदेश म्हणजे कोणाचेही न ऐकणाऱ्या नगरपालिका पदाधिका-यांवर लगाम कसण्यासाठी पंकजा मुंडे यांनी पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारBeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडfraudधोकेबाजी