विजेच्या लपंडावामुळे ग्रामीण भाग त्रस्त
पाटोदा : तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने वीजप्रवाह खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याचा मोठा फटका छोटे व्यापारी, व्यावसायिक यांना सहन करावा लागत आहे. विजेचा सुरळीत पुरवठा करावा, अशी मागणी वीजग्राहकांतून केली जात आहे. अद्यापही वीज वितरणकडून याबाबत लक्ष दिले गेलेले नाही.
डुकरांकडून नुकसान, शेतकरी हवालदिल
पाली : परिसरात रानडुकरांकडून पिकांचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित असून, वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. रानडुकरांमुळे पिके फस्त होऊ लागले आहे. हातातोंडाशी आलेला घास अशा प्रकारे जाताना दिसत असल्याने शेतकरी हवालदिल आहे.
वाहतुकीस अडचण
वडवणी : शहरापासून कवडगाव देवडीसह ग्रामीण भागातील गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काटेरी वेल, झाडे वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत. यामुळे वाहन चालविताना अडचणी येत आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील काटेरी झाडे तोडण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.