शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांची रजा टाकून गेलेला शिक्षक आठ वर्षांपासून गैरहजर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:35 IST

दोन दिवसांची किरकोळ रजा घेऊन गेलेला सहशिक्षक आठ वर्षांपासून अनधिकृतपणे गैरहजर राहिला. अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने त्याच्याविरुद्ध बुधवारी बडतर्फीची कारवाई केली.

ठळक मुद्देसीईओंची कारवाई : जिल्हा परिषद सेवेतून केले बडतर्फ

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दोन दिवसांची किरकोळ रजा घेऊन गेलेला सहशिक्षक आठ वर्षांपासून अनधिकृतपणे गैरहजर राहिला. अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने त्याच्याविरुद्ध बुधवारी बडतर्फीची कारवाई केली.माजलगाव तालुक्यातील राजेगाव केंद्रांतर्गत असलेल्या वाघोरा जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत सहशिक्षक शेख अन्वर पाशा नसिरोद्दीन हे कार्यरत होते. ८ जुलै २०१० रोजी दोन दिवसांची किरकोळ रजा देऊन ते गेले होते. मात्र ते पुन्हा रुजू झाले नाहीत. अनधिकृतपणे गैरहजर राहिल्यामुळे १५ जून रोजी २०१८ पर्यंत किंवा त्यापूर्वी अनधिकृतपणे गैरहजर राहिल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समक्ष उपस्थित राहून खुलासा सादर करण्याचे आदेशित केले होते. मात्र या शिक्षकाकडून खुलासा करण्यात आला नाही. तसेच तो कार्यालयात उपस्थित झाला नाही. माजलगाव पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकाºयांनी सदर शिक्षकाचा शोध घेतला असता शेख अन्वर पाशा नसिरोद्दीन यांच्या सेवापुस्तिकेवरील मूळ पत्त्यावरही ते रहात नसल्याचे समजल्याने त्याबाबत पंचनामा करण्यात आला. तब्बल आठ वर्षांपासून शेख अन्वर पाशा नसिरोद्दीन हे जिल्हा परिषद सेवेत अनधिकृतपणे गैरहजर राहिले. त्याचबरोबर त्यांच्याकडून कोणताही खुलासा प्राप्त झाला नाही. तसेच त्यांच्या सेवापुस्तिकेवरील पत्त्यावर ते राहत नसल्याचे स्पष्ट झाल्याने सदर शिक्षकाविरुद्ध शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली. सदर शिक्षकाची कृती महाराष्टÑ जि.प.जि. सं. (वर्तवणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग करणारी असल्याने सहशिक्षक शेख अन्वर पाशा नसिरोद्दीन यांना म.जि.प.जि.से. (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ४ (७) या तरतुदीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा परिषद सेवेतून बडतर्फ केले. बुधवारी या संदर्भातील आदेश जारी करण्यात आले. या आदेशाची नोंद सदर शिक्षकाच्या मूळ सेवापुस्तिकेत घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.अखेर कुठे गेले अन्वर ?सहशिक्षक शेख अन्वर हे ८ वर्षांपासून अनधिकृतपणे गैरहजर राहिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.त्यांच्या गैरहजेरीबाबत कुटुंबियांकडूनही शिक्षण विभागाला माहिती अथवा खुलासा मिळू शकलेला नाही.त्यामुळे शेख अन्वर पाशा हे कुठे आहेत? ते हजर का झाले नाहीत? असे प्रश्न अनुत्तरित आहेत.

टॅग्स :Beedबीडzp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक