शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमधील देवडीत मजूराचा तर मादळमोहीत तरूणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 20:13 IST

पैसा, जुन्या वादाचे कारण; भांडणात मार लागल्याने झाला मृत्यू

वडवणी / गेवराई (बीड ) : वडवणी तालुक्यातील देवडी येथे भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या उसतोड मजूराचा तर गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे जुन्या भांडणातून एका हॉटेलचालक असलेल्या तरूणाचा खून झाला. दोन्ही घटनांमध्ये हाणामाऱ्या झाल्या होत्या. यात मृत्यू झाल्याने खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

बाळु उर्फ आनंत निवृत्ती तळेकर (३१ मादळमोही ता.गेवराई) यांचे मादळमोही येथे हॉटेल आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास चौघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली होती. जखमी तळेकर यांना तातडीने बीड येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, सोमवारी सकाळी मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी मृतदेह जिल्हा रूग्णालयात करण्यात आली. याप्रकरणी गेवराई ठाण्यात भाऊ ज्ञानेश्वर निवृत्ती तळेकर याच्या फियार्दीवरून गणेश प्रताप मोटे, जगदिश भिमराव मोटे, अनिल भिमराव मोटे, शाम अनिल मोटे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद गटकुळ हे करीत आहेत. दरम्यान,  मयत तळेकर याच्यावर गेवराई ठाण्यात मटका, विनयभंग, मारामाऱ्या सारखे जवळपास १५ गुन्हे दाखल आहेत.

मध्यस्थी करणे मजूराच्या अंगलटवडवणी तालुक्यातील देवडी येथे दोघात पैश्याच्या वादातुन भांडण जुंपले. हे भांडण सोडविण्यासाठी गावातीलच शेख अजमोद्दीन शेख जैनोद्दिन (३५) हे मध्यस्थी म्हणून गेले. याच हाणामारीत शेख अजमोद्दिन यांच्या डोक्यात जबर मार लागला. यामुळे शेख हे जागीच ठार झाले. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाले. रात्री उशिरापर्यंत वडवणी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करणे सुरू होते. पोलीस उप अधीक्षक श्रीकांत डिसले, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनBeedबीड