शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दोन डोक्यांचे बाळ २४ तासांतच दगावले, बीडमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:50 IST

अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिलेने रविवारी रात्री एक शरीर आणि दोन डोक्यांच्या मुलाला जन्म दिला. शिशू अतिदक्षता विभागात या बाळाला ठेवण्यात आले होते; परंतु २४ तासांतच हे बाळ दगावले.

- अविनाश मुडेगावकरअंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिलेने रविवारी रात्री एक शरीर आणि दोन डोक्यांच्या मुलाला जन्म दिला. शिशू अतिदक्षता विभागात या बाळाला ठेवण्यात आले होते; परंतु २४ तासांतच हे बाळ दगावले.येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागात परळी तालुक्यातील एक महिला बाळांतपणासाठी दाखल झाली होती. पूर्वीची कागदपत्रे तपासताना तिच्या पोटातील बाळ ‘अ‍ॅबनॉर्मल’ आहे, हे लक्षात आल्यानंतर सर्व दक्षता घेत प्रसुतीशास्त्र विभागातील प्रख्यात सर्जन तथा सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय बनसोडे आणि त्यांच्या सहकाºयांनी रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही अवघड शस्त्रक्रिया पूर्ण केली.या बाळाचे वजन ३ किलो ७०० ग्रॅम होते. त्याचे दोन्ही मेंदू कार्यरत होते. परंतु सोमवारी रात्री ८.३०वाजता त्याची प्रकृती बिघडली. डॉ. बनसोडे आणि त्यांच्या सहकाºयांनी या बाळास वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु त्यास यश आले नाही.डॉक्टरांनी हे बाळ वैद्यकीय अभ्यासासाठी रुग्णालयाच्या शरीर रचनाशास्त्र विभागात ठेवण्याची विनंती केली होती; मात्र पालकांची मानसिकता अनुकूल नसल्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करून मुलाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.बाळाच्या आईला तीन मुली आणि एक मुलगा असून हे पाचवे अपत्य होते. बाळाच्या आईची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.२0१४ ची पुनरावृत्तीया ‘अबनॉर्मल’ बाळाला दोन डोके, दोन किडणी आणि दोन फुफुसे असली तरी इतर सर्व अवयव एक -एकच होते. या वैद्यकीय महाविद्यालयात यापूर्वी २०१४ साली एका महिलेने अशाच एका ‘अबनॉर्मल’ बाळाला जन्म दिला होता. मात्र ते बाळ लगेच मृत पावले होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र