शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बीड : अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूतीगृहात दोन तोंडाच्या बाळाचा जन्म, डॉ. संजय बनसोडेंनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 11:04 IST

अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विभागाच्या प्रसूती विभागात रविवारी (29 ऑक्टोबर ) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास दोन तोंड असलेल्या बाळाचा जन्म झाला.

बीड - अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विभागाच्या प्रसूती विभागात रविवारी (29 ऑक्टोबर ) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास दोन तोंड असलेल्या बाळाचा जन्म झाला. या विभागातील प्रख्यात सर्जन व सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली असून बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत. बाळाच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यासाठी त्याला शिशू अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. 

अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूती विभागात परळी तालुक्यातील एक महिला बाळंतपणासाठी दाखल झाली होती. तिच्यावर उपचार करताना व तिची पूर्वीची कागदपत्रं तपासताना तिच्या पोटातील बाळ अॅबनॉर्मल आहे हे लक्षात आल्यानंतर सर्व दक्षता घेतल्या.  डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलेचे सीझर केले व बाळाचा जन्म झाला. दरम्यान जन्माला आलेल्या बाळाला दोन तोंडे होते. या बाळाचे वजन ३ किलो ७०० ग्रॅम असून बाळ आणि बाळाच्या आईची प्रकृती सध्या चांगली आहे. सध्या बाळावर शिशू अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

याच वैद्यकीय महाविद्यालयात २०१४ साली एका महिलेने सातव्या महिन्यात दोन तोंडे असलेल्या बाळाला जन्म दिला होता. मात्र त्या बाळाचा जन्मानंतर मृत्यू झाला होता. या बाळांच्या आयुष्याबद्दल खात्रीशीर काहीही सांगता येत नसले तरी बाळं अनेकवर्षे जगत असल्याचीही अनेक उदाहरणे वैद्यकीय शास्त्र अभ्यासात आढळून आले असल्याचेही डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.

दरम्यान, या बाळाच्या आईला यापूर्वी तीन मुली आणि एक मुलगा असून हे पाचवे अपत्य असून बाळाच्या आईची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले. डॉ. संजय बनसोडे हे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूतीवास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करू लागल्यानंतर अनेक अवघड शस्त्रक्रिया करुन त्यांनी अनेक महिलांचे व बाळांचे प्राण वाचवले आहेत. 

एवढेच नव्हे तर अवघड शस्त्रक्रियांचे देशपातळीवर विक्रम केले असून वैद्यकीय महाविद्यालयाचे आणि प्रसूती विभागाचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर स्पष्टपणे उमटवले आहे. डॉ. संजय बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या अलौकिक कार्याचे कौतुक डीन डॉ. सुधीर देशमुख, अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. शैलैष वैद्य यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी केले आहे.