शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परळीत दोन गटांत धुमश्चक्री; ११ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 01:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : शहरातील गणपती मंदिराजवळ बुधवारी रात्री दहाच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरुन भोईगल्लीत राहणाऱ्या दोन गटात हाणामारी झाली. यावेळी दगडफेकही करण्यात आली. रात्री घटनास्थळी शहर पोलिसांनी तातडीने भेट देत शांतता प्रस्थापित केली. दोन्ही गटातील एकूण ११ जणांना गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास भोईगल्लीतून शहर पोलिसांनी अटक केली आहे.येथील भोईगल्लीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : शहरातील गणपती मंदिराजवळ बुधवारी रात्री दहाच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरुन भोईगल्लीत राहणाऱ्या दोन गटात हाणामारी झाली. यावेळी दगडफेकही करण्यात आली. रात्री घटनास्थळी शहर पोलिसांनी तातडीने भेट देत शांतता प्रस्थापित केली. दोन्ही गटातील एकूण ११ जणांना गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास भोईगल्लीतून शहर पोलिसांनी अटक केली आहे.

येथील भोईगल्लीत राहणाºया युवकांच्या दोन गटात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. याठिकाणी शाम बावणे, आकाश बावणे हे दोघेजण थांबलेले होते. आकाशासोबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरुन वाहेद रशीद खान पठाण, नादर खान समंदर खान पठाण, मारुफ शेख माजिद सर्व राहणार भोईगल्ली यांच्यासह इतर सात ते आठ जणांनी शिवीगाळ करुन दगडफेक व मारहाण केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. आरोपींनी बघून घेऊ अशी धमकी दिली. जखमी शाम शंकर बावणे व आकाश बावणे यांच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.वाहेद रशीद खान यांना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरुन आकाश बावणे यांनी मारहाण केली. तसेच शाहरुखला ही नाकावर मारले. तसेच मिराज शेख यांनाही धकाबुक्की केली. त्यानंतर तेथून मारहाण करणारे लोक निघून गेले.

एका गटातील मारहाण प्रकरणी वाहेद रशीद खान यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावरुन आकाश गंगाधर बावणे, शाम शंकर बावणे, कृष्णा बावणे व इतर आठ ते दहा जणांविरुध्द खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीन्ही आरोपी परळी शहर पोलिसांनी जेरबंद केले.दुसºया गटातील शाम शंकर बावणे यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वाहेद खान रशीद खान पठाण, मिराज शहाबुद्दीन शेख, शेख शाहरुख शेख माजिद, बाबा खान फिरोज खॉन, शेख मारुफ शेख माजिद, फैजल खान, नसीम खान, शेख शकील उर्फ जुबेर शेख शबीर, नादर खान समंदर खान, पठाण रा.भोईगल्ली यांच्या विरुद्ध खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रकरणातील आठही आरोपींना परळी शहर पोलिसांनी अटक केली आहे. परळी शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत मानकर, सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय काळे, उपनिरीक्षक विकास आडे, एन. डी. हारगावकर, शंकर गुडे व इतर पोलिस कर्मचाºयांनी आरोपींना अटक केली आहे.

टॅग्स :BeedबीडPolice Stationपोलीस ठाणेCrimeगुन्हाArrestअटक