कारची दुचाकीला धडक, एक जखमी
बीड : भरधाव कारने चुकीच्या दिशेने येत दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील रमीज अतहर खान पठाण हे जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. याप्रकरणी पठाण जाकेर खान यांच्या फिर्यादीवरून कार चालक संतोष बनसोडे विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडच्या नगर रोडवरून दुचाकीची चोरी
बीड : शहरातील नगर रोड परिसरातून पांडुरंग धोंडिबा वायभट यांच्या मालकीची दुचाकी हँडललॉक तोडून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. २६ डिसेंबर रोजी दुपारी तहसील कार्यालयासमोर ही घटना घडली. याप्रकरणी वायभट यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सहायक फौजदार सोनवणे हे तपास करीत आहेत.
सोयाबीन खरेदी विक्रीवरून मारहाण
बीड : शेतातील सोयाबीन खरेदी विक्रीच्या कारणावरून एकास गजाने व काठीने मारहाण करीत जखमी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चांदणी येथील तळपट्टी नामक शेतात अमोल कदम यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या फिर्यादीवरून संभाजी साखरे, गणेश पिंपळे, विष्णू गवते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रस्त्यात अडवून मारहाणप्रकरणी गुन्हा
बीड : आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे घराकडे जाणाऱ्या श्रीकांत धर्मराज चौधरी यांना अडवून जाण्यास अडथळा निर्माण केला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी प्रसाद चौधरीविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात अला आहे.