शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जावयाकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न, आजोबाची फिर्याद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 19:55 IST

नवीन कपडे घ्यायचे आहेत, असे आमिष दाखवून ऊसतोडणीसाठी गेलेल्या मुलाच्या सहा वर्षीय मुलीला (नातीला) पळवून नेणा-या जावयाविरूद्ध आजोबाने फिर्याद दिली आहे.

बीड : नवीन कपडे घ्यायचे आहेत, असे आमिष दाखवून ऊसतोडणीसाठी गेलेल्या मुलाच्या सहा वर्षीय मुलीला (नातीला) पळवून नेणा-या जावयाविरूद्ध आजोबाने फिर्याद दिली आहे. गेवराई तालुक्यातील खामगाव येथे ही घटना शनिवारी रात्री घडली. दरम्यान, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अत्याचाराच्या प्रयत्नात असणा-या जावयाला गेवराई पोलिसांनी रात्री खामगाव परिसरातीलच उभ्या उसातून बेड्या ठोकल्या. चिमुकली सुरक्षित घरी परतल्याने कुटुंबीयांच्या चेह-यावर हास्य फुलले होते. असे असले तरी नात्याला काळिमा फासणा-या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.वर्षा (नाव बदललेले) ही आई-वडील उसतोडणीसाठी गेल्याने आपल्या आजोबाजवळ वास्तव्यास होती. नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली. याचवेळी नात्याने मामा असलेला (आत्याचा पती) हिराजी मोतीराम फुलवारे (रा.मुरूम ता.घनसावंगी जि.जालना) हा शाळेत आला. शिक्षकांशी खोटे बोलून वर्षाला तुला नवीन कपडे घ्यायचे आहेत, असे सांगून शाळेतून घेऊन गेला. खामगाव परिसरात पाण्याची सोय असल्याने सर्वत्र उसाचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. याच उसात तो वर्षाला घेऊन गेला. इकडे नातेवाईक वर्षाचा सर्वत्र शोध घेत होते, परंतु ती मिळाली नाही. त्यांनी गेवराई पोलीस ठाणे गाठले आणि कैफियत मांडली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्वता: तपासासाठी बाहेर पडले. चौकशी केली असता हिराजी वर्षाला घेऊन गेल्याचे समजले. हिराजी हा दारुड्या असल्याने नातेवाईकांना चिंता होती. आपल्या चिमुकलीसोबत काही अनर्थ तर होणार नाही, या काळजीने ते घायाळ झाले होते.दुस-या बाजूला नात्याने मामा असणा-याच हिराजीने वर्षाला पळवून नेल्याने आणि तिचे वय अवघे सहा वर्ष असल्याने तपास लावण्याचे मोठे आव्हान आहेर यांच्यासमोर होते. सुरुवातीला त्यांनी गावात चौकशी केली. त्यानंतर एका खब-यामार्फत त्यांना वर्षाला उसात नेल्याचे समजले. पोलीसही घाबरले. दूरवर सर्वत्र उसच दिसत असल्याने त्यांना सापडणे मुश्कील पण अशक्य नव्हते. त्यातच तो चिमुकलीस काही करणार तर नाही ना? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.आहेर यांनी तत्काळ पोलिसांची फौज मागविली. नातेवाईकांनाही सोबत घेतले, परंतु यश आले नाही. रात्री सात वाजेच्या सुमारास आहेर यांना एका कोप-यात ऊस हलल्याचे दिसले. त्यांनी त्या दिशेने धाव घेतली असता हिराजीने वर्षाला डांबून ठेवल्याचे दिसले. त्यांनी चतुराईने हिराजीच्या तावडीतून वर्षाची सुटका केली. अवघ्या दहा तासात तपास लावल्याने गेवराई पोलिसांबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या टिमने केली.अन् वर्षा धायमोेकलून रडली...दिनेश आहेर यांनी वर्षाला सुखरूप नातेवाईकांच्या स्वाधीन केले. आपले कुटुंबीय दिसताच वर्षाने आजीकडे धाव घेतली आणि तिच्या कुशीत जाऊन धायमोकलून रडू लागली. यावेळी इतर नातेवाईकांनाही अश्रू अनावर झाले. वर्षा परत आल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसत होता.पोलिसांची यशस्वी कामगिरीदिवसभर शोधल्यानंतरही वर्षा आणि हिराजी मिळत नव्हते. सापडावे तर कोठे? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. परंतु पोलिसांनी माघार घेतली नाही. अंधार पडेपर्यंत हिराजीचा शोध घेतला. यामध्ये त्यांना यश आले. पोलिसांचा आवाज शांत झाल्याचे समजताच हिराजी बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु ही पोलिसांची ह्यचालह्ण होती, हे त्याला बेड्या ठोकल्यावर समजले.