शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

पैशासाठी आईलाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 15:13 IST

बेपत्ता वडिलांच्या मिळालेल्या पीएफच्या पैशातील शिल्लक राहिलेल्या चार लाख रूपयांसाठी जन्मदात्या आईलाच दोन मुलांनी भर चौकात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

बीड : बेपत्ता वडिलांच्या मिळालेल्या पीएफच्या पैशातील शिल्लक राहिलेल्या चार लाख रूपयांसाठी जन्मदात्या आईलाच दोन मुलांनी भर चौकात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना केज तालुक्यात कानडीमाळी येथे शनिवारी सायंकाळी घडली.

सरपंचांनी वेळीच मध्यस्ती केल्याने आई या हल्ल्यातून सुखरूप बचावली. ५० वर्षीय आई इंदुबाई  कुचेकर यांच्या फिर्यादीवरून नितीन व संतोष कुचेकर या दोन्ही मुलांना केज पोलिसांनी अटक केली आहे. 

आईला भर चौकात आणून संतोषने बाटलीत आणलेले पेट्रोल आईच्या डोक्यावर टाकले तर नितीनने खिशातून काडीपेटी काढून जळती काडी अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित हल्ल्यात सरपंचांनी प्रसंगावधान राखत नितीनच्या हातातील काडी फेकून दिली आणि पुढील अनर्थ टळला.

या हल्ल्यातून बचावलेल्या इंदुबाई यांनी केज पोलीस ठाणे गाठून दोन्ही मुलांविरूद्ध फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सिद्धे पुढील तपास करत आहेत. दोन्ही मुलांना न्यायालयाने दि. ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिलाMarathwadaमराठवाडा