शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाचा फास ! महिलेकडून जाच होत असल्याने तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 19:39 IST

दीपक याच्या बहिणीने त्याचा मोबाइल तपासला असता त्यामध्ये संबंधित महिलेचे फोटो दिसून आले.

ठळक मुद्देसंबंध तोडण्यासाठी त्याने त्याचा मोबाइल नंबरदेखील बदलला होता.नंतर पुन्हा त्या महिलेकडून त्रास देणे सुरू झाले.

बीड : धारूर तालुक्यातील कासारी फाटा येथील शेतवस्तीत एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना ४ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी आस्कमिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, तरुणाचा मोबाइल त्याच्या बहिणीने तपासला असता, पुणे येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी ६ डिसेंबर रोजी रात्री उशिरा धारूर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दीपक सुभाष सांगळे (वय २५, रा. कासारी पाटी, धारूर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने ४ डिसेंबर रोजी गावाजवळील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याची आणि पुणे येथील रहिवासी आरती हिच्याशी सोशल मीडियावरून ओळख झाली होती. त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दरम्यान तो तिला भेटण्यासाठी पुणे येथे गेला होता. मात्र, त्यानंतर दीपक याच्याकडे असलेला ट्रक नावावर कर, शेती नावावर कर, तसेच लग्न करण्यासाठी आरतीकडून मानसिक छळ सुरू झाला होता.

संबंध तोडण्यासाठी त्याने त्याचा मोबाइल नंबरदेखील बदलला होता. मात्र, दीपक याचा मित्र ज्ञानेश्वर मुर्गीकर याने त्या महिलेला नंबर दिला. त्यानंतर पुन्हा त्या महिलेकडून त्रास देणे सुरू झाले. याला कंटाळून दीपक याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने टोकाचे पाऊल का उचलले, याचा सुगावा घरच्यांना लागत नव्हता. मात्र, दीपक याच्या बहिणीने त्याचा मोबाइल तपासला असता त्यामध्ये संबंधित महिलेचे फोटो दिसून आले. त्यावरून सर्व घटना उघड झाली. त्यानंतर ६ रोजी रात्री उशिरा धारूर पोलीस ठाण्यात शीतल घुगे यांच्या फिर्यादीवरून आरती (रा. पुणे) व ज्ञानेश्वर मुर्गीकर (रा. धारूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सपोनि. प्रदीप  डोलारे करीत आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाBeedबीडSuicideआत्महत्या