शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्स्फार्मर जळाल्याने 15 दिवसांपासून 5 गावांना होतो केवळ 3 तास वीज पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 15:25 IST

तालुक्यातील प्रकल्प ग्रस्तांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाऊतपुर, दादाहारी वडगाव सह 5 गावांना मागील 15 दिवसांपासून विजेच्या समस्येला तोंड देण्याची वेळी आली आहे. दाऊतपुर 33 के.व्ही. सबस्टेशनचा ट्रान्स्फार्मर बिघडल्याने या गावात विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

परळी ( बीड ) दि. 25 : तालुक्यातील प्रकल्प ग्रस्तांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाऊतपुर, दादाहारी वडगाव सह 5 गावांना मागील 15 दिवसांपासून विजेच्या समस्येला तोंड देण्याची वेळी आली आहे. दाऊतपुर 33 के.व्ही. सबस्टेशनचा ट्रान्स्फार्मर बिघडल्याने या गावात विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या गावामध्ये दिवसातून केवळ 3 तासच विज पुरवठा चालू असतो व 21 तास विज गुल असते.

१० सप्टेबरला दाऊतपुर येथील 33 के.व्ही. सबस्टेशन ट्रान्सफार्मर मध्ये बिघाड झाला आहे. याचा मोठा फटका दाऊतपुर, दादाहरी वडगाव, दगडवडी, सेलू, धारावती तांडा या गावानां बसला आहे. ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, शेतीला पाणी देणे तसेच जीवनावश्यक गोष्टींची पूर्तता करणे सुद्धा कठीण झाले आहे. ग्रामपंचायतीच्या विहीरीवरील विद्युत मोटारी विजे अभावी चालू नसल्याने गावात पाणी पुरवठा होत नाही. तसेच धान्याचे दळण करण्यासाठी ग्रामस्थांना परळीत यावे लागत आहे. 

वीज मंडळाचे दुर्लक्ष ग्रामस्थ त्रस्त असताना वीज मंडळ या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दाऊतपुरचे सरपंच प्रविण दिलीपराव बिडगर यांनी केला आहे. शेती पंपाचाही विज पुरवठा बंद असल्याने गेल्या 15 दिवसांपासून पाणी असूनही पिकांना पाणी देण्यास अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे कापूस, ऊसाचे नुकसान होत आहे. यासोबतच ग्रामस्थांचे हाल होत असल्याची प्रतिक्रिया रमेश बिडगर व प्रभाकर सुरवसे यांनी दिली. 

मागील ४ दिवसांपासून वीज पुरवठा बंद  

दाऊतपुर सह कांही गावांत 8 तास विज पुरवठा चालू आहे. 2 तास शेती पंपासाठी विजपुरवठा चालू आहे. यासोबतच  दाऊपुरातील 33 के.व्ही. चा ट्रान्सफार्मर हा 21 सप्टेंबर रोजी बिघडला असून तो दुरूस्तीसाठी पाठविण्यात आला आहे. लवकरच ट्रान्सफार्मर दुरूस्त होऊन विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याची माहिती वीज मंडळातील अधिका-यांनी दिली.