अंभोरा : आष्टी तालुक्यातील गौखेल हे गाव अत्यंत दुर्गम भागात आहे. याठिकाणी पहिली ते चौथीपर्यंत असलेली शाळा गेल्या वर्षीच्या मार्चपासून बंद असून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण चालू आहे. मात्र, या काळात शिक्षकांनी शाळा अनुदानाचा इतरत्र खर्च न करता व लोकसहभाग जमा करून शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.
कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या शाळा बंद आहेत. मात्र, ऑनलाइन शिक्षण चालू आहे. या काळात शिक्षकांबद्दल बऱ्याच तक्रारीसुद्धा समाज माध्यमातून आल्या. शिक्षकांनी शाळा बंदच्या काळात ऑनलाइन शिक्षणाबरोबरच शाळेच्या भौतिक सुविधासुद्धा अद्ययावत करण्याचे काम केले आहे. गौखेल येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शहाजी मोरे व सहशिक्षक संदीप सिरसाठ यांनी गावातील ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष अशोक शेकडे, सरपंच कृष्णा शेकडे यांच्या सहकार्याने लोकसहभाग जमा केला व या लोकसहभागाबरोबरच शाळेच्या अनुदानाचाही त्यांनी यासाठी उपयोग केला. यामध्ये संपूर्ण शाळेला नवीन रंग देण्यात आला. शाळेच्या भिंती शैक्षणिक बोलक्या करण्यात आल्या. शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून वर्ग सजावट केली. परिसरामध्ये वृक्ष लागवड करून त्या ठिकाणी ते वृक्ष जोपासण्याचे काम या दोन्ही शिक्षकांनी केले आहे.
शाळेत ई-लर्निंगची सुविधासुद्धा उपलब्ध करण्यात आली असून यासाठी ते डिजिटल टीव्हीचा वापर करीत आहेत. शैक्षणिक चॅनेलवर होणारे शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर उपलब्ध व्हावेत यादृष्टीने त्यांनी ई-लर्निंग सुविधा अद्ययावत केली आहे.
विद्यार्थ्यांना शाळेमध्ये गोडी लागावी याचबरोबर शाळेच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांचे मन रमावे हा उद्देशाने शाळेचा बहुतेक परिसर सुंदर करण्याचा प्रयत्न असतो.
मुख्याध्यापक शहाजी मोरे व सहशिक्षक संदीप शिरसाट यांचे गटसिक्षणाधिकारी सुधाकर यादव विस्तार अधिकारी सीमा काऴे व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
शाळाबंद काळातसुद्धा शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण देऊन शाळेचा परिसर अत्यंत सुंदर केला असून शाळेचा चेहरामोहरा बदलण्यातमध्ये त्यांनी नक्कीच कौतुकास्पद काम केले आहे
- केंद्रप्रमुख ज्ञानदेव आडसरे
===Photopath===
030421\img-20210402-wa0122_14.jpg