शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१२ व्या शतकापासूनची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित; योगेश्वरी मंदिरात आराध बसविण्यास परवानगी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 15:55 IST

महाराष्ट्रात केवळ अंबाजोगाईतच मंदिरात आराध बसण्याची परंपरा कायम राहिलेली आहे. मात्र  ही परंपरा खंडित झाल्याने अनेक भाविकांचा हिरमोड झाला आहे.

- अविनाश मुडेगांवकर 

अंबाजोगाई  -  महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व महाराष्ट्रातील  पूर्ण शक्तीपीठ असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव हा योगेश्वरी देवीच्या स्थापनेचा महोत्सव म्हणून साजरा होतो. १२ व्या शतकात श्री योगेश्वरी देवीच्या मंदिराची स्थापना झाली.  त्या वेळेपासून मंदिरात आराध बसण्याची परंपरा आहे. मात्र सलग दोन वर्षे  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हणून मंदिरात आराध बसण्यासाठी महिला व भाविकांना परवानगी देण्यात आली नाही. शेकडो वर्षानंतर ही परंपरा सलग दुसऱ्या वर्षी  खंडित झाली आहे. महाराष्ट्रात केवळ अंबाजोगाईतच मंदिरात आराध बसण्याची परंपरा कायम राहिलेली आहे. मात्र  ही परंपरा खंडित झाल्याने अनेक भाविकांचा हिरमोड झाला आहे. 

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी अंबाजोगाईची श्री योगेश्वरी देवी हे पूर्ण शक्तीपीठ आहे. १२ व्या शतकात जयंती नदीच्या तिरावर योगेश्वरी मंदिराची स्थापना झाली  असल्याचे  येथील शिलालेखात नमूद आहे. पूर्वी नगराची रचना ही नदीच्या काठी असायची. त्याच उद्देशाने १२ व्या शतकापूर्वी अंबाजोगाई शहर हे रेणुकादेवी परिसरात असणाऱ्या मूळ जोगाई या देवीच्या आजूबाजूला असावे. असा उल्लेखही केला जातो. मात्र कालांतराने काही प्रसंग उद्भवल्याने १२ व्या शतकात योगेश्वरी मंदिराची हेमाडपंथी पद्धतीने उभारणी झाली. मूर्तीकला विकसित होण्याअगोदर देवीचा अवतार हा तांदळ्याचा असायचा. असेच देवीचे तांदळे महाराष्ट्रात अंबाजोगाई व माहूर या दोनच शक्तीपिठाच्या ठिकाणी आहेत. १२ व्या शतकात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या शुभमुहुर्तावर योगेश्वरी मंदिराची स्थापना झाली. आणि ही पौर्णिमा योगेश्वरी देवीच्या जन्माचा उत्सव म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेला योगेश्वरी देवीची मोठी यात्रा भरते. 

योगेश्वरी देवीच्या स्थापनेचा दिवस धरून पूर्वीचे नऊ दिवस असा नवरात्र महोत्सव अंबाजोगाईतील भाविकांनी सुरू केला. या महोत्सवाच्या कालावधीत भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात यासाठी योगेश्वरी मंदिरात आराध बसण्याची परंपरा १२ व्या शतकातच सुरू झाली. ती परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योगेश्वरीचा नवरात्र महोत्सवही भाविकाविनाच साजरा झाला.  मंदिरे खुली झाली. मात्र, सामजिक अंतर, मास्कचा वापर व मंदिरात दर्शनाचा कालावधी याच्या वेळा ठरलेल्या असल्याने तसेच भाविकांना आजही श्री योगेश्वरीचे दर्शन बाहेरूनच घ्यावे लागते. आत गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही. आता मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवात योगेश्वरी देवल कमिटीने  दर्शनाची व्यवस्था दूर अंतरावरूनच  केली आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महोत्सवात किमान पंधरा हजार महिला मंदिरात आराध बसतात. या महिला भाविकांना आराध बसण्यासाठी सर्व सोयी व सुविधा मंदिर प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातात. वर्षानुवर्षे आराध बसणाºया महिलांची संख्या वाढतच चालली आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रथा बंद राहिल्याने अनेक महिला भाविकांमध्ये आपण नवरात्र महोत्सवात योगेश्वरी देवीपासून दुरावल्याची भावना निर्माण झाली आहे.

१० डिसेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान मार्गशीर्ष महोत्सवमहाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान तथा अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव १० डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मंदिरात महिलांना व भाविकांना आराध बसण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.  याची भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन देवल कमिटीचे सचिव अ‍ॅड. शरद लोमटे यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेच्या उपाययोजना म्हणून मंदिर प्रशासनाच्या वतीने सर्व उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.शुक्रवार पासुन मार्गशीर्ष महोत्सव प्रारंभ होत असल्याने मंदिराची स्वच्छता, रंगरंगोटी, मंदिराचे सॅनिटायझेशन करून घेण्यात आले आहे. तसेच भाविकांना दर्शनासाठी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी गर्दी न करता सामाजिक अंतर ठेवून, मास्कचा वापर करून दर्शन घ्यावे. व मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अ‍ॅड. शरद लोमटे यांनी केले आहे. 

टॅग्स :BeedबीडOmicron Variantओमायक्रॉन