शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून परित्यक्ता महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:40 IST

एका २६ वर्षीय परित्यक्ता महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सतत पाच वर्षे अत्याचार केल्याची घटना केज शहरात घडली आहे. लग्न कधी करणार, अशी विचारणा करण्यासाठी पीडिता आरोपीच्या घरी गेली असता आरोपीच्या नातेवाईकांनी मारहाण करून तिला व तिच्या दोन मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली.

केज : एका २६ वर्षीय परित्यक्ता महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सतत पाच वर्षे अत्याचार केल्याची घटना केज शहरात घडली आहे. लग्न कधी करणार, अशी विचारणा करण्यासाठी पीडिता आरोपीच्या घरी गेली असता आरोपीच्या नातेवाईकांनी मारहाण करून तिला व तिच्या दोन मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पाच जणांविरुद्ध केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.६ वर्षांपूर्वी वषार्पूर्वी सदर पीडितेला दोन मुले झाल्यानंतर पतीने सोडून दिले होते. ती आपल्या माहेरी राहत असताना डिसेंबर २०१३ मध्ये खुदुस अब्दुल वहाब इनामदार (रा. रोजा मोहल्ला, केज) याने तिला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार केले. तिने सतत लग्नासाठी तगदा लावला. मात्र आरोपीने नंतर लग्न करू असे म्हणून वेळ मारून नेली.पाच वर्षांपासून सतत जबरदस्तीने होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून पीडित महिला ही १७ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता खुदूस इनामदार याच्या घरी गेली. तिने लग्न कधी करणार आहेस, अशी विचारणा करताच आरोपीचे नातेवाईक अब्दुल रहेमान अब्दुल वहाब इनामदार, अब्दुल्ला उर्फ अब्दुल वहाब इनामदार, करिमोद्दीन अब्दुल वहाब इनामदार, राजू अब्दुल वहाब इनामदार यांनी पीडितेच्या चारित्र्याबाबत अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तू पुन्हा लग्न कर म्हणून आमच्या घरी आलीस तर तुला आणि तुझ्या दोन्ही मुलांना मारून टाकू अशी धमकी देऊन पीडितेस हाकलून दिले.पीडित महिलेच्या तक्रारीवरून वरील सर्वांविरुद्ध बलात्कार, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला. केजच्या उपजिल्हा रुग्णालयात पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपी फरार आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे हे करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी