शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करून अत्याचार; १० वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 23:52 IST

अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने दोषी ठरवून विकास साहेबराव साबळे (वय २४, रा. तागडगाव, ता. शिरुर) यास दहा वर्षे सक्तमजुरी तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्या. अंजू श. शेंडे यांच्या न्यायालयाने गुरुवारी सुनावली.

ठळक मुद्देप्रमुख जिल्हा व सत्र न्यायालाचा निकाल : तागडगाव येथील प्रकरण, एक हजार रुपये दंड

बीड : अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने दोषी ठरवून विकास साहेबराव साबळे (वय २४, रा. तागडगाव, ता. शिरुर) यास दहा वर्षे सक्तमजुरी तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्या. अंजू श. शेंडे यांच्या न्यायालयाने गुरुवारी सुनावली.शिरुर येथील शेतकरी कुटुंबातील अल्पवयीन मुलीच्या घरासमोरच असलेल्या हॉटेलमधील वेटर व स्वयंपाकी विकास साहेबराव साबळे याने लग्नाचे आमिष दाखवून तिला फूस लावून पळवून नेले होते. याबाबत मुलीच्या वडिलांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सदर मुलीला वडिलांच्या ताब्यात दिले. वडिलांनी मुलीस विश्वासात घेत अधिक विचारपूस केली असता, आरोपीने तिला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर जामखेडमधील लॉज तसेच वडशिवन आणि केडगाव शिवारातील शेतांमध्ये अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. या प्रकरणी वडिलांनी शिरुर पोलीस ठाण्यात पुरवणी जबाब नोंदवून प्रकरणांची अधिक माहिती पोलिसांना कळविली.एकंदरीत दिलेल्या फिर्यादीवरुन तसेच पुरवणी जबाबावरुन शिरुर ठाण्यात अपहरण, बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. उपनिरीक्षक एम. आर. काझी यांनी तपास करुन महत्वाच्या साक्षीदारांचा जबाब नोंदवून अधिक पुरवा संकलित केला. आरोपीविरुद्ध दिसून येत असलेल्या सबळ पुराव्यामुळे न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्या. अंजू श. शेंडे यांच्या न्यायालयात झाली. गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात पिडीत मुलगी व इतर साक्षीदारांच्या साक्ष ग्राह्य धरुन तसेच परिस्थितीजन्य व कागदोपत्री पुराव्यांचे अवलोकन करुन न्यायालयाने आरोपीस अपहरण तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दोषी ठरविले.अपहरण प्रकरणी ३ वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड तसेच कलम ६ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार १० वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. आरोपीला दोन्ही शिक्षा एकत्रितरीत्या भोगावयाच्या आहेत. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील मंजुषा दराडे यांनी काम पाहिले. पैरवीचे कामकाज सहायक फौजदार सी. एस. इंगळे यांनी पाहिले.

टॅग्स :BeedबीडCourtन्यायालय