बीड : राज्यभरातील पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा ४ डिसेंबरपासून बदलण्यात आल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाचे कार्यासन अधिकारी डी. जी. शेडमेखे यांनी राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांना याबाबतचे पत्र दिले आहे.
यापूर्वी राज्यभरात पशुवैद्यकीय दवाखाना उघडा ठेवण्याच्या वेळा दोन टप्प्यांत होत्या. त्यात १ फेब्रुवारी ते ३० सप्टेंबर या काळात सकाळी ८ ते दुपारी १ व दुपारी ३ ते सायंकाळी ५ तर १ ऑक्टोबर ते ३० जानेवारी या काळात सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते सायंकाळी ६ अशी वेळ होती. यात बदल करून आता सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते ४.३० (दुपारी १ ते १.३० जेवणाची वेळ) तसेच शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ अशी वेळ असणार आहे. हे बदलेले वेळापत्रक पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी -१ व २, तालुका व जिल्हा पशुचिकित्सक सचिवालये, फिरता पशुवैद्यकीय दवाखाना यासाठी लागू असणार आहे. शिवाय, आकस्मिक परिस्थितीत पशुपालकांना २४ तास सेवा उपलब्ध असणार आहे. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले असून, ४ जानेवारीपासून या बदलेल्या वेळेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे.
चौकट
...तर तक्रार करणार : शार्दूल देशपांडे
नवीन परिपत्रकाप्रमाणे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे. नसता लेटलतिफांच्या तक्रारी करून कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणार, अशी प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते शार्दूल देशपांडे यांनी दिली.