शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या मर्जीतील मुख्याधिकाऱ्यांच्या पुढे नगराध्यक्षांवर नामुष्कीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 13:46 IST

माजलगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष शेख मंजूर व मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यात मागील एक ते दीड महिन्यांपासून तू तू मै मै सुरु आहे.

ठळक मुद्देबैठक शासनच्या नियमाविरूध्द असल्याचे सीओचे पत्रपुन्हा तीन वाजता बोलवावा लागली ऑनलाईन बैठक

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव : येथील नगराध्यक्षांनी शुक्रवारी बोलावलेल्या विशेषसभेत मुख्याधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न आमदार प्रकाश सोळंके यांच्यामुळे बारगळला आहे. मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी व नगरविकास खात्याला ही बैठक शासनाच्या नियमाविरूध्द असल्याने बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचे पत्र दिल्याने एकाकी पडलेल्या नगराध्यक्षांना अखेर सभा रद्द करून पुन्हा तीन वाजता ऑनलाईन बैठकीचे आयोजन करावे लागले.

माजलगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष शेख मंजूर व मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यात मागील एक ते दीड महिन्यांपासून तू तू मै मै सुरु आहे. यामुळे नगराध्यक्षांनी शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेत मुख्याधिकारी भोसले यांच्या कामाचे अवलोकन करून अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न होता. तसेच मालमत्ता कर मूल्यांकन,  पाणीपट्टी, आर्यवैश्य व  मराठा भवनाला जागा उपलब्ध करुन देण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय होणार होता. मात्र, मुख्याधिकारी भोसले यांच्यावर आपल्याच मर्जीतील नगराध्यक्षांकडून अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याने आ. प्रकाश सोळंके यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्याधिकारी यांची बाजू घेत नगरसेवकांना त्यांच्यासोबत राहण्यास आ. सोळंके यांनी बजावल्याचे नगरसेवकांतून बोलले जात आहे. यामुळे विशेष सभेत अविश्वास ठराव आणणे बारगळे.

आता ३ वाजता ऑनलाईन बैठक शुक्रवारी सकाळीच मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी व नगरविकास खात्याला पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी सांगितले की, ही बैठक शासनाच्या नियमाविरुद्ध असल्याने मी बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही. यानंतर एकाकी पडलेल्या नगराध्यक्षांनी ही बैठकच रद्द केली. तीन वाजता ऑनलाइन बैठक बोलावण्याची नामुष्की नगराध्यक्ष शेख मंजुर यांच्यावर आली.

टॅग्स :BeedबीडPrakash Solankeप्रकाश सोळंकेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMayorमहापौर