शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

थरारक ! पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर चोरट्यांची दगडफेक, अपघातानंतर चोरटे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 13:08 IST

चोरीच्या दोन गाई घेऊन जाणारी जीप उलटल्याने जीपमधील दोन्ही गाई जखमी झाल्या.

बीड : जनावरांची चोरी करून मालवाहू जीपमधून पलायन करणाऱ्या चोरट्यांचा नागरिकांनी पाठलाग केला. नागरिकांच्या मदतीला पोलीसही धावले. चोर पुढे अन् पोलीस मागे असा खेळ सुरू झाला, पण चोरट्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक ( Thieves throw stones on chasing police ) केली. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने चोरट्यांची जीप उलटली. त्यानंतर चोरटे पसार झाले. ३१ रोजी पहाटे शहरातील नगर नाक्यावर हा थरार घडला.

शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेच्यासुमारास मालवाहू जीप (एचआर ७३ ए. ५६५) मधून आलेल्या चोरट्यांनी बालेपीर भागातील चाऊस गल्लीतील मुदस्सीर गुड्डू चाऊस यांच्या दोन गाई चोरून नेण्याचा प्रयत्न केला. गाईंची चोरी झाल्याने मुदस्सीर चाऊस यांच्यासह अर्शद खान, शेख आकेफ, शेख सोहेल या तरुणांनी नगर रोडवरील पोलीस पेट्रोल पंपासमोरून जीपचा पाठलाग सुरू केला. नगर नाक्याजवळ चोरट्यांच्या वाहनाच्या चालकाने पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या अंगावर जीप घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गस्तीवरील पोलीस आले. त्यांनी पाठलाग सुरू केला, तेव्हा चोरट्यांनी जीपमधून पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावण्यास सुरुवात केली. सुदैवाने पोलिसांना दगड लागला नाही. मात्र, पोलिसांच्या तावडीतून निसटण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटला अन् जीप उलटली. यानंतर जीपमधील सहा चोरट्यांनी वेगवेगळ्या दिशेने पोबारा केला.

दोन गाई जखमीचोरीच्या दोन गाई घेऊन जाणारी जीप उलटल्याने जीपमधील दोन्ही गाई जखमी झाल्या. नागरिक व पोलिसांनी गाईंना सुरक्षितपणे जीपमधून बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी गाईंना उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले.

टोमॅटोच्या क्रेटमध्ये दगडदरम्यान, जीपमध्ये टोमॅटोची ने-आण करण्यासाठीचे क्रेट आढळून आले. मात्र, त्यात दगड, गोटे होते. अपघातग्रस्त जीप शिवाजीनगर ठाण्यात आणून लावली असून, त्यात एक मोबाईल, ब्रेडची पाकिटे व गुंगीकारक औषधी आढळून आली. बेवारस व गोठ्यातील गाईंना बेशुद्ध करून त्यांची चोरी करणारी ही टोळी असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.----

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड