शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! साडेतीन लाखांसाठी ऊसतोड मुकादमाला ३६ दिवस डांबले;पोलिसांनी कराडमधून केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 16:54 IST

मुकादमास सुरक्षित पाहून त्यांची पत्नी व मुले यांना अश्रू अनावर झाले.

बीड : येथील एका ऊसतोड मुकादमाला साडेतीन लाख रुपयांसाठी बीडमधीलच दोन मुकादमांनी डांबून ठेवले होते. बीड शहर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ३६ दिवसांनंतर कराड येथून त्याची ८ मार्च रोजी सुटका केली. यावेळी दोघांना अटक करण्यात आली आहे.

श्रीमंत यादवराव राजपुरे (५५, रा.पारगाव सिरस, ता.बीड), असे अपहृत मुकादमाचे नाव आहे. त्यांच्याकडे ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर असून, मजूरही पुरवितात. दरम्यान, अप्पा द्वारकू फरताडे (रा. मलकाची वाडी, ता.शिरूर) हा ऊसतोड मुकादम असून, त्याने सातारा जिल्ह्यातील सह्याद्री साखर कारखाना, यशवंतनगर (ता. कराड) सोबत करार केला होता. राजपुरे यांनी सहा जोड्या व ट्रॅक्टर पुरविण्यासाठी फरताडेंकडून साडेचार लाख रुपये उचल घेतली होती. मात्र, मजूर व ट्रॅक्टर न पुरविल्याने त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा सुरू झाला. १२ फेब्रुवारी रोजी राजपुरे हे शहरातील अंबिका चौकात भाजीपाला विक्री करीत होते. यावेळी त्यांचे चारचाकी वाहनातून अप्पा फरताडे व त्यांचा कामगार अर्जुन तुकाराम टुले (रा. नवगण राजुरी, ता.बीड)या दोघांनी अपहरण केले.

श्रीमंत राजपुरे यांना कराड येथील कारखान्यावर नेऊन एका खोलीत डांबले. दरम्यान, १३ फेब्रुवारी रोजी राजपुरे यांनी फोनवरून अपहरण झाल्याचे कळविले. राजपुरे कुटुंबीयांनी त्यांची सुटका करण्याची विनंती फोनवरून अप्पा फरताडेकडे केली. मात्र, त्याने दाद दिली नाही. अखेर श्रीमंत यांच्या पत्नी जिजाबाई फरताडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार केली, शिवाय उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली. अखेर अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके, पो.नि. रवी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महादेव ढाकणे व हवालदार बाळासाहेब सिरसाट हे ८ मार्च रोजी कराडला गेले. त्यांनी तेथील तळबीड पोलीस ठाणे व सातारा गुन्हे शाखेच्या मदतीने दुपारी चार ते साडेचारदरम्यान अपहृत श्रीमंत राजपुरे यांची सुटका केली. यावेळी अप्पा फरताडे व अर्जुन टुले या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना ९ रोजी न्यायालयात हजर केले असता ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

कुटुंबीयांना अश्रू अनावरदरम्यान, तब्बल ३६ दिवसांनंतर श्रीमंत राजपुरे यांना घेऊन बीड शहर पोलीस ९ मार्च रोजी बीडला पोहोचले. त्यांना सुरक्षित पाहून त्यांची पत्नी व मुले यांना अश्रू अनावर झाले. पोलीस ठाण्यात मुलाने त्यांना मिठी मारली तेव्हा श्रीमंत राजपुरे यांनाही गहिवरून आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड