शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

बीडमध्ये तीन हजार अनुयायांना धम्मदेसना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 23:58 IST

जिल्ह्यात बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. याकरिता गेल्या तीन महिन्यापासून शहरात भिक्खु धम्मशिल यांचा सहावा वर्षावास सुरू आहे. या सोहळ्यात विश्वाच्या शांतीसाठी उपस्थित भिक्खु संघाने तब्बल तीन हजार अनुयायांना त्रिशरण आणि पंचशिल ग्रहन करून बौध्द धम्माची धम्मदेसना दिली.

ठळक मुद्देविश्वशांतीचा संकल्प : भन्ते धम्मशील यांचा वर्षावास उत्साहात, बौध्द उपासक-उपासिकांच्या धम्म रॅलीने वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. याकरिता गेल्या तीन महिन्यापासून शहरात भिक्खु धम्मशिल यांचा सहावा वर्षावास सुरू आहे. या सोहळ्यात विश्वाच्या शांतीसाठी उपस्थित भिक्खु संघाने तब्बल तीन हजार अनुयायांना त्रिशरण आणि पंचशिल ग्रहन करून बौध्द धम्माची धम्मदेसना दिली. भन्ते, बौध्द उपासक-उपासिका यांचा उत्स्फूर्त सहभाग असलेल्या धम्म रॅलीने बीडकरांचे लक्ष वेधून घेतले होते.बीड शहरात तीन महिन्यांपासून भन्ते धम्मशिल यांचा सहावा वर्षावास सुरू आहे. त्या अनुषंगाने रविवारी समापना व भिक्खू संघदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भावनापर्यंत विविध धार्मिक देखाव्याने बौद्ध धम्म रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत शंभर भन्तेंसह तीन हजार बौद्ध उपासक-उपासिका तसेच आंबेडकरी अनुयायी पांढरेशुभ्र वस्त्रे परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे या रॅलीने शहरवासियांसह अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.बीड शहरातला हा ऐतिहासिक सोहळा भिक्खू डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन भिक्खू सद्धम्मादित्य सदानंद महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भिक्खू धम्मसेवक महाथेरो उपस्थित होते. भिक्खू शरणानंद महाथेरो यांच्या हस्ते मुख्य धम्म ध्वजारोहण करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्याध्यक्ष संदिप उपरे हे उपस्थित होते. प्रमुख पाहूणे म्हणून पिईसोचे अध्यक्ष एस.पी.गायकवाड, बबन कांबळे, अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे, राज्य उपायुक्त रवंीद्र जोगदंड, अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, तहसिलदार राहूल गायकवाड, राजेंद्र घोडके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.तथागत सिध्दार्थ गौतम बुध्दांचा बौध्द धम्म हा मानवाच्या कल्याणाचा धम्म आहे. या धम्मामध्ये जगण्याचा मार्ग बुध्दांनी सांगीतलेला आहे. त्यामुळे या धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. याकरिता हा ऐतिहासिक वर्षावास व भिक्खु संघदान सोहळा बीडमध्ये होत असल्याचे धम्मविचार मांडण्यात आले. यावेळी भिक्खू डॉ.खेमधम्मो महाथेरो, भिक्खु काश्यप महाथेरो, भिक्खू धम्मदीप महाथेरो, भिक्खू यशकाश्यपायन महाथेरो, भिक्खू डॉ. एम.सत्यपाल महाथेरो, भिक्खू दयानंद महाथेरो, भिक्खू करूणानंद थेरो, भिक्खू काश्यप थेरो, भिक्खू हर्षबोधी थेरो, भिक्खू ज्ञानरक्षित थेरो, भिक्खू शिवलीबोधी थेरो, भिक्खू पय्यातीस्स थेरो, मुदीतानंद थेरो,भिक्खू पय्यारत्न थेरो, भिक्खू महावीरो, भिक्खू पय्याबोधी, भिक्खू प्रज्ञापाल, भिक्खू महाकाश्यप, भिक्खू धम्मधर, भिक्खू पय्यानंद, भिक्खू अश्वजित, भिक्खू सुभूती, भिक्खू शीलरत्न, भिक्खू बोधीशील, भिक्खू संघपाल, भिक्खु नागसेन, भिक्खु काश्यप, भिक्खू बोधीधम्मा, भिक्खू संघप्रीय, भिक्खू रेवतबोधी, भिक्खू एस.नागसेन, भिक्खू धम्मसार, भिक्खू चित्तज्योती, भिक्खू अश्वदिप यांच्यासह मान्यवरांनी मनोगत मांडले. भन्ते धम्मशिल यांच्या सहाव्या वर्षावास समापन, भिक्खू संघदान कार्यक्रमास जिल्ह्यातील बौध्द उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशांत वासनिक यांनी संवर्धिले माणुसकीचे मूल्यभन्ते धम्मशिल यांनी वर्षावासच्या काळात अवघा बीड जिल्हा बौध्द तत्वज्ञानाने ढवळून काढीत बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार केला आहे. अगामी काळात भन्ते धम्मशिल यांचा हा प्रचार आणि प्रसार केवळ वाहनाअभावी थांबू नये यासाठी भसपाचे नेते प्रशांत वासनिक यांनी भन्ते धम्मशिल यांना चारचाकी गाडी घेण्यासाठी रविवारच्या कार्यक्रमात धनादेश सुपुर्द केला आहे. या उदात धम्म भावनेतून प्रशांत वासनिक यांनी माणुसकिचे मुल्य संवर्धिले असून समाजामध्ये एक आदर्श पायंडा निर्माण केला आहे.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम