शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
6
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
7
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
8
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
9
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
10
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
11
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
12
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
13
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
14
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
15
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
16
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
17
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
18
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
19
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
20
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर

बीडमधील कोट्यावधी रुपयांच्या जलयुक्त घोटाळ्यात तीन निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 12:06 IST

Jalyukata Shivar Scam: याप्रकरणी २०१७ मध्ये परळी शहर पोलीस ठाण्यात २ कोटी ४१ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता.

बीड : जलयुक्त शिवार योजनेतील कोट्यवधी रुपयांच्या अपहार (Jalyukata Shivar Scam )प्रकरणात पाच वर्षांपासून फरार असलेल्या तीन निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना गुन्हे शाखेच्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान १५ फेब्रुवारीला रात्री अटक केली. परळी शहरात ही कारवाई करण्यात आली असून, पकडलेल्या तिघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले.

याप्रकरणी २०१७ मध्ये परळी शहर पोलीस ठाण्यात २ कोटी ४१ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. सुनील दिनकर गिते (५८, रा. हालगे गल्ली, परळी), उल्हास गणपतराव भारती (६४), त्र्यंबक दिगांबर नागरगोजे (६४, दोघे रा. माणिकनगर, परळी) यांना राहत्या घरातून सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे व सहकाऱ्यांनी अटक केली.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले होते. दरम्यान, या कामांची ५ पथकांमार्फत चौकशी करण्यात आली होती. पथकाने १५ टक्के कामांची निवड तपासणीसाठी केली होती. एकूण ८१५ कामांपैकी १२३ कामे निवडण्यात आली. त्यातील १०३ कामांची तपासणी झाली असून, त्यातील ९५ कामांमध्ये अनियमितता झाल्याचे उघड झाले होते. पथकाने या कामांमध्ये तब्बल ९० लाखांची रक्कम वसूल पात्र असल्याचा अभिप्राय दिला. त्यामुळे आता ६२ कंत्राटदार संस्था आणि अधिकारी कर्मचाऱ्यांकडून या रकमेच्या वसुलीसाठी विभागीय कृषी सहसंचालकांनी नोटीस बजावली आहे. तथापि, केवळ १५ टक्के कामांमध्ये ९० लाख रुपये वसूल करण्याचे आदेश आले. सर्वच कामांची तपासणी केल्यावर घोटाळ्याच्या रकमेचा तर आकडा वाढेलच, पण वसूल पात्र रकमेतही मोठी भर पडू शकते.

न्यायालयीन कोठडीत रवानगीदरम्यान, तीनही निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना १६ फेब्रुवारीला परळी न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी झाली, अशी माहिती पो. नि. हरिभाऊ खाडे यांनी दिली.

९० लाख रुपयांच्या वसुलीचे आदेशबहुचर्चित जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळ्यात कंत्राटदार संस्था आणि अधिकाऱ्यांवर तब्बल ९० लाखांची वसुली निश्चित केली आहे. ही रक्कम तातडीने भरण्यासाठी औरंगाबादच्या विभागीय कृषी सहसंचालकांनी कंत्राटदार संस्था व अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.

असा आहे घोटाळा : एकूण कामे : ८१५तपासणीसाठी घेतलेली कामे : १२३तपासणी पूर्ण : १०३अनियमितता असलेली कामे : ९५

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडagricultureशेती