शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

बीड जिल्ह्यात २४ तासांत तीन हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 17:54 IST

अंबाजोगाई शहरात भाजपा नगरसेवक, बीडमध्ये ४७ वर्षीय महिला तर शिरूरमध्ये एका तरूणाची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटना अवघ्या २४ तासांत घडल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

बीड : अंबाजोगाई शहरात भाजपा नगरसेवक, बीडमध्ये ४७ वर्षीय महिला तर शिरूरमध्ये एका तरूणाची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटना अवघ्या २४ तासांत घडल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई येथील नगर परिषदेतील भाजपाचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (३४) यांची शुक्रवारी (18 जानेवारी)रात्री धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली. भावावर होणार हल्ला सोडवण्यासाठी ते धावले होते. याप्रकरणी भावकीतील राज जोगदंड, मनोज जोगदंड, विजय जोगदंड, अर्जुन जोगदंड, मालू जोगदंड आणि करण  जोगदंड या सहा जणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोघांना अटक केली असून अद्यापही चौघे फरार आहेत. भाऊ नितीन याचे भावकितीलच महिलेसोबत असलेले अनैतिक संबंध विकास यांच्या जिवावर बेतले. हे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

दुस-या घटनेत बीड शहरातील पेठबीड भागातील अयोध्यानगर भागात शिलावती किसन गिरी (४७) या महिलेची भाजी कापण्याच्या बतईने गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. हत्येनंतर संबंधित आरोपीने रक्ताने माखलेली बतई बाजूलाच असणा-या एका विहिरीत टाकून पळ काढला. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंद करणे सुरू होते.

तरूणाला विष पाजले; पाच जणांवर गुन्हाविनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या तरूणास फिर्यादीसह इतर पाच जणांनी विषारी द्रव्य पाजून जिवे मारले. ही घटना शुक्रवारी घडली. नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात ठिय्या मांडल्यानंतर रात्री उशिरा आदिनाथ खेडकर, अनिता खेडकर व तिचा भाऊ रामनाथ आघाव व इतर दोघांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात माजी सरपंच असलेल्या आदिनाथ खेडकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

टॅग्स :MurderखूनBeedबीड