शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात तीन कारखान्यांनी केले साडे चौदा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 18:59 IST

तालुका परिसरात असलेल्या सुंदरराव सोळंके, जय महेश व छत्रपती या तीन साखर कारखान्यांनी शुक्रवार (ता. २४)पर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे.

माजलगाव (बीड ) : तालुका परिसरात असलेल्या सुंदरराव सोळंके, जय महेश व छत्रपती या तीन साखर कारखान्यांनी शुक्रवार (ता. २४)पर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. यातून १४ लाख ७ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सरासरी साखर उताऱ्यात जय महेश कारखाना आघाडीवर असून परिसरात अद्यापही २५ टक्के शेतकऱ्यांचा ऊस फडातच उभा आहे. 

सतत चार वर्ष दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील दोन वर्षापासून पावसाने मोठा दिलासा दिला आहे. समाधानकारक झालेल्या पावसाने पैठण, माजलगाव धरण शंभर टक्के भरले. दोन्ही धरणाचे कालवे, माजलगाव धरणाचे बँकवाटर, गोदावरी, सिंदफणा नदीवरील उच्चपातळी बंधारे, उर्ध्वकुंडलीका प्रकल्प यातील मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा ऊस उत्पादनासाठी पुढे सरसावला असून मोठ्याप्रमाणात ऊस लागवड झाली आहे.

माजलगाव परिसरातील ऊस गाळप करण्यासाठी तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके, सावरगाव येथील छत्रपती तर, पवारवाडी येथील जय महेश हे तीन साखर कारखाने यावर्षी पूर्णक्षमतेने सुरु आहेत. शुक्रवार (ता. २४) पर्यंत वरील तिन्ही कारखान्याने एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून १४ लाख ७ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. वरील तिन्ही कारखान्यापैकी जय महेशचा साखर उतारा सर्वाधिक (१०.०३) असून शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल वेळेवर देण्यात छत्रपती कारखाना आघाडीवर आहे. 

तीन कारखान्याचे गाळप :

कारखान्याचे नाव        -   ऊस गाळप   - साखर उत्पादन  -  सरासरी उतारा

सुंदरराव सोळंके कारखाना - ५,४९,५०० मे.ट. - ५,१४,६५० क्विंटल - ९.४६ टक्केजय महेश कारखाना -     ६,८५,६३५ मे.ट. - ६,७७,८०० क्विंटल – १०.०३ टक्के छत्रपती कारखाना     -   २,२०,४११ मे.ट. – २,१५,००० क्विंटल – ९.९० टक्के

गेटकेनमुळे कार्यक्षेत्रातील ऊस फडातच वरील तिन्ही कारखानदारांनी गाळप हंगामाच्या सुरुवातीला गेटकेनचा (बाहेरचा) ऊस आणण्यावर भर दिला. दोन महिने सर्वाधिक तोडणी यंत्रणा बाहेर असल्याने कार्यक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस आजही फडातच उभा आहे. गाळपाच्या प्रतीक्षेत असलेल्या ऊसाचे पाणी तोडल्याने वजनात घट होत असून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेBeedबीड