शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात वळण रस्त्यावर तीन बाईक भिडल्या; तिघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 19:15 IST

भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी आहेत.

ठळक मुद्देमदत न करता बघ्यांची फोटोसाठी गर्दी

माजलगाव : गढी रोडवरील एमआयडीसीजवळील वळण रस्त्यावर तीन बाईकच्या विचित्र अपघातात एका महिलेसह दोनजण जागीच ठार झाले. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात इतर दोघे गंभीर जखमी असून त्यांना अधिक उपचारासाठी बीड येथे रवाना करण्यात आले आहे. 

येथील एमआयडीसीजवळ असलेल्या बुखारी शाळेजवळ एक वळण रस्ता असून या ठिकाणी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तीन बाईकमध्ये ( क्रमांक एम.एच. 12 क्यू.डी. 3207 , एम.एच. 47 ए. एफ. 0765 ) विचित्र अपघात झाला. या अपघातात तिन्ही बाईकचा अक्षरशः चुराडा झाला आहे. यात बाईकवरील गणेश श्रीकिसन मिसाळ (30 रा. देवळा ता. सेलू जी. परभणी) व अनोळखी महिला व पुरुष जागीच मृत झाली. तर अपघातात शंकर जितू भोसले, अजित भोसले ( रा. केकात पांगरी ता. गेवराई) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी बीड येथे रवाना करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके, धोंडीराम मोरे, बाबरे , विठ्ठल राठोड, सहा. फौजदार शेळके, अनिल अत्तेवर यांनी येऊन मृतदेह उचलून ग्रामीण रुग्णालयात पाठवले तसेच खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. 

माणुसकी हरवू लागली अपघात झाल्यानंतर येथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र अर्धातास जखमी मदतीविना रस्त्यावर पडून होते. त्यांना उचलून दवाखान्यात नेण्याचे धारिष्ट कोणीच दाखविले नाही तसेच पोलिसांना देखील कोणी कळविले नाही. प्रत्येकजण मोबाईलमध्ये फोटो घेण्यात आणि शूटिंग काढण्यात व्यस्त होती. यामुळे माणुसकी हरवत चालली आहे की काय असा प्रश्न पडू लागला आहे. 

आमदार सोळंकेचे चिरंजीव धावले मदतीला आ. प्रकाश सोळंके यांचे चिरंजीव विरेंन सोळंके  आणि त्यांचे सहकारी सुशील डक, सुरेश धुमाळ, लखन मुंडे हे या मार्गावरून जात असताना त्यांना गर्दी दिसून आली. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत दोन गंभीर जखमींना व मृतदेहांना ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीड