शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन कोटींच्या बक्षिसाच्या आमिषाने परळीच्या युवकाला तीन लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:19 IST

‘बीएमडब्ल्यू’ कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त ३ कोटी ३५ लाखांचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून ती रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी वेगवेगळे कारणे सांगत युवकाला २ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा गंडा घालण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘बीएमडब्ल्यू’ कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त ३ कोटी ३५ लाखांचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून ती रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी वेगवेगळे कारणे सांगत युवकाला २ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा गंडा घालण्यात आला. ही घटना परळी शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.परळी शहरातील थर्मल कॉलनीत राहणारा १९ वर्षीय युवक गणेश (नाव बदललेले) याला ‘बीएमडब्ल्यू’ कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त ३ कोटी ३५ लाखांचे बक्षीस लागले असल्याचा संदेश २१ डिसेंबर रोजी मिळाला होता. त्याला भुलून गणेशने संदेशमध्ये देण्यात आलेल्या मेल आयडीवर स्वत:चा पत्ता, फोन क्रमांक, व्यवसाय याबद्दलची माहिती पाठविली. त्यांनतर २४ डिसेंबर रोजी सिमेन पॉल नावाचा व्यक्ती तुमची रक्कम आणि बक्षीस घेऊन नवी दिल्ली येथे आला असून त्याचा कस्टम चार्ज म्हणून २४ हजार ५०० रुपये संदीप सिंग नामक व्यक्तीच्या खात्यावर जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार गणेशने सदरील रक्कम त्यांच्याकडे जमा केली. त्यानंतर बक्षिसाची रक्कम गणेशच्या खात्यावर जमा होत असल्याचे भासविण्यात आले. ५५ टक्के रक्कम खात्यावर जमा झाल्याचे दर्शवून ‘कन्फर्म कोड’च्या नावाखाली अनिकेत कडून दीड लाख रुपये जमा करून घेण्यात आले. त्यांनतर ७५ टक्के रक्कम जमा झाल्याचे भासवून उर्वरित रकमेसाठी टॅक्स चार्जच्या बहाण्याने २ लाख २८ हजार ५०० रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. त्यापैकी १ लाख १४ हजार रुपये गणेशने कृष्णा आणि मानसी या दोन व्यक्तींच्या खात्यावर टाकले. परंतु, संशय आल्याने अनिकेतने काही लोकांशी याबाबत चर्चा केली आणि आपली फसवणूक होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर गणेशने संभाजीनगर पोलीस ठाणे गाठून फसवणूक झाल्याची तक्रार दिली. अनिकेतच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा नोंद झाला असून संभाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :BeedबीडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी