शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात मुलींच्या जन्मदरात हजारामागे तब्बल १५ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 06:52 IST

अवैध गर्भपात झाले कमी; बीड जिल्ह्यात ‘माजलगाव पॅटर्न’ने जनजागृतीला नवी दिशा

- पुरूषोत्तम करवा माजलगाव (जि. बीड) : मुलींच्या जन्मदराबाबत मागे असलेल्या बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात मागील ४-५ वर्षांमध्ये मुलींच्या जन्मदरात समाधानकारक वाढ होत आहे. मागील आठ महिन्यांत १ हजार मुलांमागे ९६७ मुली असा जन्मदर रहिला आहे. ५ वर्षांपूर्वी तो हजाराला ८५० पेक्षा कमी होता. एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत झाली आहे. बीड जिल्ह्यात अवैध गर्भपाताची प्रकरणे उघडकीस आली होती.एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयांतर्गत १ जून २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या आठ महिन्यांच्या कालावधीत १ हजार ९७७ महिलांच्या प्रसूती झाल्या. त्यात १ हजार १३ मुले जन्माला आली तर ९६४ मुलींचा जन्म झाला. सप्टेंबर २०१९ मध्ये १३२ मुले तर १३८ मुलींचा जन्म झाला. हा जन्मदर १ हजार मुलांच्या तुलनेत १ हजार १४५ एवढा होता. आठ महिन्यांत तीन महिने मुलींचा जन्मदर एक हजारांपेक्षाही जास्त होता. त्यात जुलै, आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा समावेश आहे. आॅगस्ट २०१९ मध्ये मुलींचा जन्मदर हजारी केवळ ७५४ होता त्यानंतर सर्व महिन्यांत ८७७ पेक्षा जास्त मुलींचा जन्मदर आहे. मागील आठ महिन्यांत हजारामागे ९६७ एवढी सरासरी निघत आहे.मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून आमच्या कार्यालयामार्फत प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ बाबत वारंवार विविध कार्यक्रम घेऊन जनजागृती केली. याचा परिणाम मुलींच्या वाढलेल्या जन्मदरावरून दिसून येत आहे.- आर. एस. बुडुख, प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी, माजलगाव