राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीच्या स्वतःच्याच सभापतींवर अविश्वास ठराव आणला होता. हा ठराव मंजूर व्हावा, यासाठी त्यांनी खोटे बोलून भाजपच्या तीन सदस्यांना पळविले होते. सभापतीवर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेस नोट काढून भाजपच्या तीन सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे माध्यमांना सांगितले. वास्तविक ते तीनही सदस्य भाजपच्या अधिकृत चिन्हांवर निवडून आले असून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही, असे असताना राष्ट्रवादीने दिशाभूल करून त्यांच्या प्रवेशाच्या बातम्या दिल्या होत्या.
भाजपचे ते तीन सदस्य भरत सोनवणे, मुरलीधर साळवे व मोहन आचार्य यांनी शुक्रवारी दुपारी वैद्यनाथ साखर कारखान्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट केले.