शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

‘टीएचओं’चे नियोजन शून्य; आरोग्य सेवा विस्कळीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 23:56 IST

कामचुकार वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच आता टीएचओंनाही शिस्त लावण्याचे आव्हान वरिष्ठांसमोर आहे. याचा सर्व फटका जनतेस सहन करावा लागत असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप : कामचुकारांना शिस्त लावण्याचे वरिष्ठांसमोर आव्हान

बीड : जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सेवा गत काही दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे नियोजन आणि वचक नसल्यानेच हा प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. कामचुकार वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच आता टीएचओंनाही शिस्त लावण्याचे आव्हान वरिष्ठांसमोर आहे. याचा सर्व फटका जनतेस सहन करावा लागत असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.जिल्ह्यात ५१ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २८० उपकेंद्र आहेत. अपवादात्मक वगळता प्रत्येक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवत नियोजन करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक तालुका आरोग्य अधिकारी आहे. मात्र, त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. स्वत: मुख्यालयी थांबत नाहीत, साधे जातही नाहीत. त्यामुळेच कामचुकार व अ‍ॅडजेस्टमेंट करणाºया वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांना अभय आहे.सीईओंच्या आदेशाला केराची टोपलीनव्याने रूजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सुरूवातीलाच बैठक घेऊन दोन्ही वैद्यकीय अधिका-यांनी मुख्यालयी राहून सेवा देण्याचे आदेश दिले होते.तसेच टिचओंनी त्यांची नियमित हजेरी घेऊन अहलवाल देण्यास सांगितले होते. मात्र, टिचओंकडून सीईओंच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली.प्रत्यक्षात ना कोणी मुख्यालयी राहते ना कोणी नियमित कर्तव्य बजावते. यात काही टिचओंचा देखील समावेश आहे.म्हणे, बातम्यांनी काही फरक पडत नाहीमाध्यमांनी आरोग्य विभागातील गलथान कारभार चव्हाट्यावर आणल्यावर काही टिचओंच्या पायाखालची जमीन सरकली. बातम्या छापल्याने आम्हाला काही फरक पडत नाही.आमच्याबद्दल वरिष्ठांना सर्व माहिती आहे. ते आम्हाला काहीच करू शकत नाहीत, अशा अविर्भावात काही टिचओ आहेत. त्यामुळे आता वरिष्ठही संशयाच्या भोवºयात सापडले आहेत.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटल